agriculture news in Marathi, partiality with farmers producers company in khandesh, Maharashtra | Agrowon

‘महाबीज’च्या अस्तित्वासाठीच शेतकरी कंपन्यांसोबत दुजाभाव
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

शेतकरी उत्पादक कंपन्या जिवंत ठेवण्यासाठी त्यांना शासकीय अनुदान मिळायला हवे. त्यांना बीजोत्पादन कार्यक्रमातून भरीव मदत पुढेही मिळायला हवी.
- ॲड. प्रकाश पाटील, अध्यक्ष, जीवनधारा शेतकरी उत्पादक कंपनी, पढावद (ता. शिंदखेडा, जि. धुळे).

जळगाव ः राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून बीजोत्पादन करण्यासंबंधी शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देणे शासनाने बंद केले आहे. तसेच बीजोत्पादनासंबंधीच्या प्राधान्य कार्यक्रमातून वगळल्याने शासन दुजाभाव करत असून, केवळ महाराष्ट्र बियाणे उत्पादक महामंडळाचे (महाबीज) अस्तित्व कायम राहावे म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांबाबत बीजोत्पादनाविषयीच्या धोरणात बदल केला आहे, असा आरोप शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केला आहे. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत महाबीजचे बियाणे पेरणाऱ्या शेतकऱ्यांना किलोमागे २५ रुपये अनुदान मिळते. परंतु हे अनुदान शेतकरी उत्पादन कंपनीने तयार केलेल्या बियाण्याला देणे शासनाने अचानक बंद केले. मागील वर्षी शेतकरी उत्पादन कंपन्यांना किमान आधारभूत दरात कडधान्याची खरेदी करण्याची मुभा होती. परंतु यंदा अजून या संबंधीचा निर्णय झालेला नाही. नाफेडला कडधान्य खरेदीचे अधिकार दिले आहेत. तसेच बीजोत्पादनासंबंधी ब्रीडर सीडचे वाटप करताना शेतकरी उत्पादक कंपन्यांना यंदा कुठलेही प्राधान्य देण्यात आलेले नाही.

डीबीटी फक्त कंपन्यांनाच का?
बीजोत्पादन कार्यक्रमात शेतकरी उत्पादक कंपन्या उत्साहाने सहभागी झाल्या. खानदेशात काही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा बियाणे यंदा उत्पादित केले. शासन आपल्या गरजेनुसार बियाणे खरेदी करीत होते. त्यापोटी अनुदानही मिळायचे. पण हे अनुदान आता डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिले जात आहे. पण महाबीजकडून बियाणे खरेदी करताना डीबीटीच्या निकषातून का वगळले आहे, असा मुद्दाही  शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून उपस्थित केला आहे.

‘महाबीज’साठी खटाटोप
‘महाबीज’ संस्था ही बीजोत्पादन व इतर उपक्रमात मागे पडून शेतकरी उत्पादक कंपन्या पुढे जाऊ नयेत यासाठी कृषी विभागाने बीजोत्पादन कार्यक्रमात वेगळे नियम तयार केले. तसेच अनुदानही बंद केले. यातच ‘महाबीज’ ही संस्था मागील ४० वर्षे व्यावसायिक तत्त्वावर बीजोत्पादन, बियाणे यासंबंधी काम करत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना उभारी मिळाण्याची गरज असून, शासनाने दुजाभाव बंद करावा, अशी मागणी शेतकरी कंपन्यांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर '...नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना...
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
ऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...
ऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
आता खाण्यातही क्रिकेट !क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...
चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...