नागपूर विभागात अडीच लाखांवर कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत सहभाग

संग्रहित चित्र
संग्रहित चित्र

नागपूर   ः पीकविम्याचा लाभ मिळत नसल्यामुळे विमा उतरविण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. परिणामी, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील केवळ ४९०८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनीच पीकविमा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याचे वास्तव समोर आले आहे. याउलट कर्जदार शेतकऱ्यांना विमा सक्‍तीचा असल्याने त्यांची संख्या २ लाख ५७ हजार ७९८ वर पोचली आहे.

कर्जदार शेतकऱ्यांना विमा सक्‍तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या भरवशावरच ही योजना तरली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गेल्यावर्षी पीकविमा काढणाऱ्या काही शेतकऱ्यांना अवघा १०० ते १५० रुपयांचा परतावा मिळाला होता. नागपूर विभागात गेल्यावर्षी विमा काढणाऱ्या अडीच लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ५४ हजार शेतकऱ्यांनाच पीकविम्याचा लाभ दिला गेला.

परिणामी, पीकविमा योजना फसवी असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत होती. पीकविम्यावर विश्‍वासच नसल्याने बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे वास्तव आहे. त्यानुसार नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत केवळ ४९०८ शेतकऱ्यांनीच पीकविमा उतरविला आहे.  

कर्जदार शेतकऱ्यांनी काढलेला विमा
जिल्हा  शेतकरी संख्या
वर्धा   ३६,८१७
नागपूर ४६,६१३
भंडारा ६४,२११
गोंदिया  ४१,६४७
चंद्रपूर  ४६,७४८
गडचिरोली   २१,७६२
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी काढलेला पीक विमा
जिल्हा शेतकरी संख्या
वर्धा ५०९
नागपूर  १८६
भंडारा २१३
गोंदिया ९४
चंद्रपूर ३२५२
गडचिरोली ६५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com