agriculture news in Marathi, Parveenant Veterinary Students' agitation was on | Agrowon

परभणीत पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 मार्च 2019

परभणी ः किमान शैक्षणिक पात्रता दहावी असलेल्या पशुधन सहायकांना पशुधन विकास अधिकारी(गट ब)पदी पदोन्नती देण्यात आल्यामुळे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. पशुवैद्यक व पशुविज्ञान पदवीधर, पदव्युत्तर, पी.एचडीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंगदेखील झाला आहे. त्यामुळे पशुधन विकास अधिकारी गट ‘क’च्या पदोन्नतीचे आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी पशुवैद्यक विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. 

परभणी ः किमान शैक्षणिक पात्रता दहावी असलेल्या पशुधन सहायकांना पशुधन विकास अधिकारी(गट ब)पदी पदोन्नती देण्यात आल्यामुळे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. पशुवैद्यक व पशुविज्ञान पदवीधर, पदव्युत्तर, पी.एचडीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंगदेखील झाला आहे. त्यामुळे पशुधन विकास अधिकारी गट ‘क’च्या पदोन्नतीचे आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी पशुवैद्यक विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. 

गुरुवारी (ता. १४) येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयास ठोकण्यात आलेले टाळे शुक्रवारी (ता. १५) कायम होते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, शनिवारी (ता. १६) पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालच्या तपासणीसाठी येणाऱ्या नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) वरिष्ठ अधिकाऱ्यांना आंदोलक विद्यार्थी त्यांना घेराव घालून पदोन्नतीचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणार आहेत. पशुधन सहायकांच्या (पशुधन विकास अधिकारी गट) पशुधन विकास अधिकारी गट ब वर पदोन्नतीचे आदेश सोमवारी (ता. ११) देण्यात आलेले आहेत. 

याप्रकरणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले. परंतु कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते.

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...