agriculture news in Marathi, Pasha Patel says Farmers life definitely will change, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चित परिवर्तन होईल : पाशा पटेल
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

नारायणगाव, जि. पुणे : काॅंग्रेसने साठ वर्षे सत्तेत राहून शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम न केल्याने देशात शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत आहे. केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गंभीरपणे दखल घेतली आहे. दोन वर्षे थांबा. काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चित परिवर्तन होईल, अशी ग्वाही राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिले.

नारायणगाव, जि. पुणे : काॅंग्रेसने साठ वर्षे सत्तेत राहून शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम न केल्याने देशात शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत आहे. केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गंभीरपणे दखल घेतली आहे. दोन वर्षे थांबा. काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चित परिवर्तन होईल, अशी ग्वाही राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिले.

ग्रामोन्नती मंडळ संचलित येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ४ ते ७ जानेवारीदरम्यान चार दिवसांच्या ग्लोबल फार्मर्स २०१८ या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ४) दुपारी श्री. पटेल यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘शेतमालविषयक आर्थिक धोरण व हमीभाव’ या विषयावर पटेल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर होते.

श्री. पटेल म्हणाले,  की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाद्य तेलावर आयात शुल्क आकारण्याचा शेतकरीहिताचा धोरणात्मक निर्णय घेतला. भाजप शासनाच्या धोरणामुळे हरभरा, सोयाबीन, वाटाणा उत्पादनाला योग्य भाव मिळाला आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी ग्राहकाची गरज ओळखून उत्पादन घेणे आवश्‍यक असून, शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कांद्याच्या भावावरून शहरी ग्राहक लगेच तक्रारी करतो. त्यामुळे सरकारे कोसळतात. अशा वेळी शहरी ग्राहकांनीही शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे.

शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत शेतकऱ्यांनी पाशा पटेल यांना प्रश्न विचारले. तसेच शेती मालाच्या हमीभावाविषयी बोलण्यास सांगितले. त्यावर याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून शेतकऱ्यांच्या भावना त्यांना सांगणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...
माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचितनागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान...
पिंक बेरी, भुरी, क्रॅकिंग टाळण्यासाठी...सध्याच्या वाातावरणामध्ये द्राक्ष बागेमध्ये पिंक...
तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे...सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत...
खानदेशात अजूनही कांदा लागवड सुरूचजळगाव : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात अजूनही कांदा...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
आर. बी. हर्बल अॅग्रोचे ‘भू-परीस’...मार्केट ट्रेंडस्.. आर. बी. हर्बल अॅग्रो ही...
ई-नामसाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारकपुणे ः आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेत (ई-...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारतेय ऊसशेतीसिंधुदुर्ग : आंबा, काजू व अन्य मसाला पीक...
मुख्यमंत्री शाळा बंद करताहेत : अजित पवारबीड : सरकार मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र...
माजी राज्यमंत्र्यांचे विहिरीत आंदोलनअकोला : बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील...
शासकीय निधी खर्चाची माहिती आता एका क्‍...रत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा...
जळगावात चवळी शेंगा २००० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
संत्र्याची झाडे पिवळी पडल्याने...अकोला : मृग बहराने दगा दिल्याने संत्रा उत्पादक...
अापल्या खात्यावर फक्त अापलाच अधिकारबँकेत भीमाबाईचं खातं राधाच्या ओळखीमुळे निघालं, हे...
सीड प्लॉटधारकांनाही बोंड अळीचा फटकाअकोला : कापूस उत्पादनासोबतच सीड प्लॉट...
नागपूर जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र आठ...नागपूर  :  पेंच प्रकल्पामुळे उद्‌भवलेला...
सोलापूरात २४०८ क्विंटल उडीद, मूग,...सोलापूर  : नाफेडच्या वतीने सोलापूर कृषी...
परभणीत ‘जलयुक्त’ची एक हजारांवर कामे... परभणी : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या...
मधमाश्यांच्या वसाहतीत वाढतेय...अमेरिकेतील इल्लिनॉईज विद्यापीठामध्ये झालेल्या...