agriculture news in Marathi, Paswan says dual price policy for sugar in Maharashtra unfeasible, Maharashtra | Agrowon

साखरेसाठी दुहेरी दर योजना अव्यवहार्य
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

नवी दिल्ली ः साखरेचे दर घसरल्याने उद्योगात वापर होणाऱ्या साखरेचा दर आणि घरगुती वापरासाठीचा दर वेगवेगळा ठरवावा. ज्यामध्ये उद्योगात वापरातील साखरेचा दर वाढविला, तरी घरगुती वापर होणाऱ्या साखरेचे दर वाढणार नाहीत आणि दराचा प्रश्न सोडविण्यात मदत होईल, अशी योजना महाराष्ट्राने केंद्राकडे मांडली होती. परंतु दुहेरी दर योजना अव्यवहार्य असल्याचे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. 

नवी दिल्ली ः साखरेचे दर घसरल्याने उद्योगात वापर होणाऱ्या साखरेचा दर आणि घरगुती वापरासाठीचा दर वेगवेगळा ठरवावा. ज्यामध्ये उद्योगात वापरातील साखरेचा दर वाढविला, तरी घरगुती वापर होणाऱ्या साखरेचे दर वाढणार नाहीत आणि दराचा प्रश्न सोडविण्यात मदत होईल, अशी योजना महाराष्ट्राने केंद्राकडे मांडली होती. परंतु दुहेरी दर योजना अव्यवहार्य असल्याचे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. 

देशात सध्या साखर दराचा प्रश्न गंभीर झाला आहे. केंद्राने वेगवेगळे उपाय करूनही दर वाढत नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने दुहेरी दर योजना केंद्रापुढे मांडली आहे. या योजनेत घरगुती वापरासाठीच्या साखरेचा वेगळा दर आणि उद्योग, प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या साखरेचा वेगळा दर ठरवावा, अशी संकल्पाना मांडली होती. 

‘‘महाराष्ट्र सरकारने घरगुती आणि उद्योगात वापरासाठीच्या साखरेसाठी दोन वेगळे अशी दुहेरी दर योजना मांडली होती. परंतु असे दर ठरविल्यास त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे प्रशासकीय पातळीवर अशक्य आहे. यातून अनेक प्रश्न समोर येतील. साखरेचा वापर कुठे होतो याचा नेमका अंदाज आणि त्यात होणारे गैरव्यवहार शोधणे अवघड आहे. प्रशासकीय दृष्टीने अशी योजना राबविणे अशक्य आहे. त्यामुळे ही संकल्पना अव्यवहार्य आहे,’’ असे मंत्री पासवान यांनी राज्यसभेत सांगितले.  

केंद्राने २०१३ पासून साखर नियंत्रणमुक्त केली. तव्हापासून साखर ही बाजारातील मागणी आणि पुरवठ्याशी जोडली जाऊन दर बदलत गेले. सरकारचे दरावर नियंत्रण राहिले नाही आणि तेव्हा पासून, सरकारने बाजारातील दर नियंत्रणासाठी कोणतेही धोरण आखले नाही. त्यामुळे दर घसरले आहेत. 

अन्नमंत्री पासवान म्हणाले, की दर नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारने साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळात दिलासा मिळावा, यासाठी दुहेरी किंमत योजना मांडली आहे. या योजनेत किरकोळ व्यापाऱ्यांना उद्योगाच्या खरेदी दरापेक्षा कमी किमतीत साखर देण्याची तरतूद होती.

काय आहे योजना
देशातील साखरेचे दर घसरल्याने कारखाने अडचणीत येऊन थकबाकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्राने विविध उपाययोजना राबवूनही दर उत्पादन खर्चापेक्षा कमीच आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दुहेरी दर योजना मांडली आहे. या योजनेत घरगुती वापर आणि उद्योगात वापर होणाऱ्या साखरेचे दर वेगवेगळे ठेवण्याची तरतूद आहे. उद्योगासाठीच्या दरापेक्षा घरगुती वापरासाठीच्या साखरेचा दर कमी असेल ज्यामुळे गरिबांवर भार पडणार नाही आणि दरही वाढतील.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...