agriculture news in Marathi, patbhani in Shot of fig growers | Agrowon

तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना फटका
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे अपरिपक्व अवस्थेत झाडावरच सुकून जात आहेत, तसेच परिपक्व झालेली फळेदेखील लवकरच सडत आहेत. त्यामुळे सिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे अपरिपक्व अवस्थेत झाडावरच सुकून जात आहेत, तसेच परिपक्व झालेली फळेदेखील लवकरच सडत आहेत. त्यामुळे सिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सिंगणापूर येथील माणिकराव सूर्यवंशी यांची दहा वर्षापासून दोन एकरावर अंजीर बाग आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात छाटणी केल्यानंतर फेब्रुवारी ते जून या कालावधीत अंजीर फळांचा हंगाम असतो. अंजिराचे चांगले उत्पादन मिळाले होते. परंतु यंदाच्या हंगामात जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात तापमानात मोठे चढ-उतार झाले. अनेकदा रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षाही कमी तर दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पेक्षा अधिक होते. तापमानात अचानक चढ-उतार झाल्यामुळे अंजिराची अपरिपक्व अवस्थेतील फळे झाडावर सुकून जात आहेत. परिपक्व झालेली फळेदेखील लवकरच सडून जात आहेत. त्यामुळे विक्री केलेली फळेसुद्धा व्यापाऱ्याने परत केली.

अंजीर फळाची सड झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. सिंगणापूर येथील शेतकरी सतीश सोगे म्हणाले, की चार एकर अंजीर बाग आहे. सुरुवातीला उत्पादन मिळाले, परंतु आता फळे सुकून गळून पडत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...