agriculture news in marathi, Pawar advice Bhujbal to takecare on health ground | Agrowon

आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा भुजबळ यांना पवारांचा सल्ला
वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

मुंबई : जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. ११) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी आरोग्याची विशेष काळजी घ्या, असा सल्ला पवार यांनी भुजबळ यांना दिला.

भुजबळ सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरून शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. या भेटीत राजकीय नाही तर प्रकृतीसंदर्भात चर्चा झाली. शरद पवार यांनी वडीलकीच्या नात्याने आपली विचारपूस केली. शिवाय, विशेष काळजी घ्या, असेही पवारांनी सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.

मुंबई : जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. ११) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी आरोग्याची विशेष काळजी घ्या, असा सल्ला पवार यांनी भुजबळ यांना दिला.

भुजबळ सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरून शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. या भेटीत राजकीय नाही तर प्रकृतीसंदर्भात चर्चा झाली. शरद पवार यांनी वडीलकीच्या नात्याने आपली विचारपूस केली. शिवाय, विशेष काळजी घ्या, असेही पवारांनी सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्याची माहिती माझ्या निकटवर्तीयांनी दिल्यानंतर मला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिला फोन आल्याची माहिती, छगन भुजबळ यांनी दिली होती. छगन भुजबळ यांना गुरुवारी (ता. १०) केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे.

या वेळी भुजबळ म्हणाले होते की, ''मला डॉक्टरांनी आराम करण्याच्या अटीवर डिस्चार्ज दिला आहे. लवकरच मी उपचार करून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना हजर राहणार आहे. जामीन मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर मला पहिला फोन पवारसाहेबांचा आला. सत्य सर्वांसमोर येईल, ज्यामुळे मला तुरुंगवास झाला. त्या महाराष्ट्र सदनाचा सर्वजण लाभ घेत आहेत, याचा मला आनंद आहे.''

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...