agriculture news in marathi, Pawar criticizes Modi government | Agrowon

सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

नगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन आहे. ते स्वीकारायचे नसते. कर्जातून मुक्त होत शेतीमालाला योग्य भाव मिळाला, तर शेतकऱ्यांची परिस्थिती बदलून ते सक्षम होतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे सरकार येण्यासाठी आघाडीचे जास्तीत जास्त खासदार संसदेत पाठविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 

नगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन आहे. ते स्वीकारायचे नसते. कर्जातून मुक्त होत शेतीमालाला योग्य भाव मिळाला, तर शेतकऱ्यांची परिस्थिती बदलून ते सक्षम होतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे सरकार येण्यासाठी आघाडीचे जास्तीत जास्त खासदार संसदेत पाठविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 

नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी कर्जत येथे गुरुवारी सभा झाली. आमदार बाळासाहेब थोरात, युवा नेते रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड या वेळी उपस्थित होते. 

या वेळी श्री. पवार म्हणाले, की नरेंद्र मोदी यांचे सरकार हुकूमशाहीचे आहे. लोकशाही राजकीय नेते अथवा पुढाऱ्यांनी नव्हे, तर लोकांनी सक्षम केली आहे. लोकाभिमुख सरकार आणि जनतेची जाण असणारे त्यागी म्हणून नेहरू-गांधी घराण्याचे उपकार विसरून चालणार नाहीत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संभाषणक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. मोदींकडे दूरदृष्टी नाही. त्यांनी सहकार, शेती आणि उद्योग मोडीत काढले आहेत. फसवी आणि खोटी स्वप्ने दाखवून ते सत्तेत आले; मात्र सध्या जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. मोदी लाट ओसरली आहे, हे नुकत्याच झालेल्या तीन राज्यांतील निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होते. 

बाळासाहेब थोरात म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळात श्री. पवार यांनी कृषी क्षेत्रात चैतन्य आणले; मात्र सध्या राज्याला कृषिमंत्रीच नाही. पक्षाच्या लेबलवर जनावरांची छावणी मंजूर केली जाते. आम्ही जनावरे जगवली, तर ते कार्यकर्ते पोसत आहेत. ज्यांना पवार यांच्या कृपेने विरोधी पक्षनेतेपद मिळाले, ते पुत्रहट्टापायी सारे विसरले. त्यांनी राजकारणाचा पोरखेळ केला.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...