देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी मोलाची साथ

औरंगाबाद : शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार - द ग्रेट एनिग्मा’ चरित्राचे प्रकाशन करताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंंग. समवेत शरद पवार, कमलकिशोर कदम, धीरूभाई मेहता, डॉ. अफरोज अहमद, प्रतापराव बोराडे, लेखक शेषराव चव्हाण आदी मान्यवर. (छायाचित्र : सचि
औरंगाबाद : शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार - द ग्रेट एनिग्मा’ चरित्राचे प्रकाशन करताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंंग. समवेत शरद पवार, कमलकिशोर कदम, धीरूभाई मेहता, डॉ. अफरोज अहमद, प्रतापराव बोराडे, लेखक शेषराव चव्हाण आदी मान्यवर. (छायाचित्र : सचि

औरंगाबाद : आपण अर्थमंत्री व पंतप्रधान असताना आलेल्या संकटात देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्याविषयी सातत्याने शरद पवार यांनी मोलाची साथ दिली. कोणत्याही संकटाचा धिरोदात्तपणे सामना करण्याची क्षमता ठेवून असलेले नेतृत्व म्हणजे शरद पवार. शास्त्रानुसार त्यांच्या नावासमोर कर्मयोगी बिरुद लावल्यास ती अतिशयोक्‍ती ठरणार नाही, अशी भावना माजी पंतप्रधान व ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे व्यक्‍त केली.

शेषराव चव्हाणलिखित "पद्मविभूषण शरद पवार - द ग्रेट एनिग्मा'' या शरद पवार यांच्या चरित्राचे शनिवारी (ता. २३) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते औरंगाबाद येथे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी डॉ. सिंग बोलत होते.

औरंगाबादमधील एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला शरद पवार यांच्यासह महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष धीरूभाई मेहता, डॉ. अफरोज अहमद, पुस्तकाचे लेखक शेषराव चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते.

डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, की शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्या वेळी महाराष्ट्राकडे सर्वांगीण विकासाच्या मार्गावरील एक अग्रणी राज्य म्हणून पाहिले जायचे. मी अर्थमंत्री झालो, तेव्हा देशाची तिजोरी खाली होती. त्या वेळी आपण देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी सर्वच खात्यांतील खर्चात कपात करण्याचा मुद्‌दा पुढे केला.

त्या वेळी देशाची गरज ओळखून संरक्षणमंत्री असलेल्या शरद पवार यांनीच एकमेव आपल्या प्रयत्नाला प्रतिसाद दिला. कोणत्याही संकटाला एकहाती व धिरोदात्तपणे सामोरे जाण्याची क्षमता शरद पवार यांच्या नेतृत्वात आहे.

श्री. पवार यांनी मनोगतातून आपल्या पन्नास वर्षांच्या सामाजिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, की आपल्या एकूणच सामाजिक जीवनातील कार्यावर कै. यशवंतराव चव्हाण व कै. विनायकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव राहिला आहे. मराठवाड्यातील जनतेने आपल्याला सातत्याने आपलं समजलं. लेखकाच्या लिखाणाबद्‌दल त्यांनी कृतज्ञता व्यक्‍त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com