agriculture news in marathi, pay compensation to ballworm affected cotton producer says Sharad pawar | Agrowon

बोंडअळीने नुकसाग्रस्त कापूस उत्पादकांना आर्थिक मदत करा : पवार
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

यवतमाळ : बीटी कापसावर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांचे सोन्यासारखे पीक हातातून गेले आहे. अद्यापही या अळीवर उत्तर सापडलेले नाही. अशा गंभीर परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढावे लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १७) केले.

यवतमाळ : बीटी कापसावर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांचे सोन्यासारखे पीक हातातून गेले आहे. अद्यापही या अळीवर उत्तर सापडलेले नाही. अशा गंभीर परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढावे लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १७) केले.

नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवार बोलत होते. या वेळी माजी मंत्री अनील देशमुख, आमदार मनोहर नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, माजी मंत्री वसुधा देशमुख, वसंतराव घुईखेडकर, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती निमीष मानकर, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की देशी वाणावर बोंडअळी आल्याने, वाण बदलाचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकन मोन्सॅटो कंपनीने पहिल्यांदा बीटी वाण तयार केले. आता अळीची प्रतिकारशक्ती वाढली तर वाणाची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे बियाणे बाजारात आले कसे यांची चौकशी झाली पाहिजे. शासनाने महसूल यंत्रंणेमार्फत यांची तपासणी केली पाहिजे, महसूल विभागाला शिवारात जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले पाहिजेत, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नांगरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च देणे आवश्यक आहे. त्यात खत, बियाणे उत्पादनाची सरासरी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज अाहे.

नागपुरात कापसावर चर्चासत्र
देशभरात कापसावर अनेक प्रकारचे संकट आले आहे. महाराष्ट्रात हे संकट जास्त आहे. त्यामुळे नागपुरात १६ डिसेंबरला कापूस संशोधन केंद्राला एक दिवसाचे कापसावर चर्चासत्र घेण्याचे सांगितले आहे. देभरातील संशोधक या निमित्ताने एकत्र येतील, या विषायावर व पुढील पेरणीकरिता काय करता येईल, यावर चर्चा करून दीर्घकालीन उत्तर घेण्याचे प्रयत्न राहणार आहेत.

माझा शेतकऱ्यांत ‘इंटरेस्ट’
तुमचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत, आम्ही टीव्हीवर बघितले आहे. तुम्ही आमचे प्रश्‍न त्यांच्याकडे मांडा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. त्यावर पवार म्हणाले, की बोंडअळीच्या प्रकरणात मला राजकारण करायचे नाही, माझा इंटरेस्ट शेतकऱ्यांत आहे. मी शेतकरी कुटुबांतील आहे. शेतकऱ्यांवर संकट आले, की त्यांना मदत करण्याची माझी भूमिका आहे. अतिवृष्टी झाली तेव्हा मी आलो होतो, त्या वेळी दिल्लीला परत गेल्यानंतर राज्याला तत्काळ मदत पाठविली होती.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लाडिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढून दुसऱ्या...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल ३३०० ते ४४००...सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक...
पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांबाबत बोलत नाहीत...अहमदाबाद, गुजरात  ः गुजरातमधील विधानसभा...
भारतात भुईमूग उत्पादन सात दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः पीक क्षेत्रात झालेली वाढ अाणि...
नोकरीसाठीच नव्हे, तर शेतीसाठी कृषी...बुलडाणा : सध्या प्रत्येकाला नोकरी हवी आहे....
कपाशीचे पीक बोंडअळीच्या घशातकिनगाव ः कापूस राज्यातील दुसरे महत्त्वाचे...
डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष... राहुरी, जि. नगर : डॉ. तनपुरे सहकारी साखर...
शरद पवारांकडून ३२ वर्षांनंतर मोर्चाचे...नागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज...
विधान भवनावर विरोधकांचा आज हल्लाबोल...नागपूर : शेतकरी कर्जमाफी, बोंड अळीमुळे कपाशीचे...
पुणे जिल्ह्यातील धरणांत १४३ टीएमसी...पुणे : यंदा पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात...
हरभरा क्षेत्रात ९७ हजार हेक्टरने वाढ परभणी : खरिपातील सोयाबीन, कापूस या प्रमुख नगदी...
शेतकरी आत्महत्येला जबाबदार मंत्र्यांवर...मानोरा, जि. वाशीम ः सोयजना येथील शेतकरी...
नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अंतिम...नाशिक : दसऱ्यापासून सुरू झालेला नाशिक भागातील...
नागपुरात सोयाबीन २८५० ते २९५० रुपयेनागपूर ः पंधरवाड्यापूर्वी २३०० ते २५०० रुपये क्‍...
कोल्हापुरात गवार, मटार तेजीतकोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
धुळे जिल्ह्यात कापसाचे उत्पादन दीड...धुळे ः गुलाबी बोंडअळीचा उद्रेक, सिंचनासाठी...
अमरावतीत बोंडअळीमुळे कपाशीत ५१...अमरावती ः या वर्षीच्या हंगामात जिल्ह्यात एक लाख ३...
खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक...नागपूर : राज्यातील झोपी गेलेल्या सरकारला जागे...
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...