agriculture news in marathi, Pay for the unpaid farmers till December 15 | Agrowon

धनादेश न वटलेल्या शेतकऱ्यांचे १५ डिसेंबरपर्यंत पैसे द्या
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 डिसेंबर 2017

नाशिक : बॅंकेत धनादेश न वटलेल्या कांदा उत्पादकांचे पैसे येत्या १५ डिसेंबरअखेरपर्यंत अदा करावेत, अन्यथा कडक कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा देत जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी ज्या दिवशी कांदा विकला त्याच दिवसाचा धनादेश उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश व्यापाऱ्यांना दिले आहे.

नाशिक : बॅंकेत धनादेश न वटलेल्या कांदा उत्पादकांचे पैसे येत्या १५ डिसेंबरअखेरपर्यंत अदा करावेत, अन्यथा कडक कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा देत जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी ज्या दिवशी कांदा विकला त्याच दिवसाचा धनादेश उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश व्यापाऱ्यांना दिले आहे.

विकलेल्या कांद्याचे धनादेश बॅंकेत न वटल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यानी संबंधित व्यापाऱ्यांकडे तक्रार केली असता टाळाटाळ केली. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तक्रारी मांडल्याने या संदर्भात पणनमंत्री सुभाष देशमुखांचे लक्ष वेधण्यात आले असता जिल्हा उपनिबंधक करे यांना या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश मंत्रालयातून देण्यात आले होते.

या अनुषंगाने उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत करे यांनी शुक्रवारी (ता. १) बैठक घेत धनादेश न वटलेल्या कांदा उत्पादकांचे पैसे १५ डिसेंबरअखेर पर्यंत अदा करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित व्यापाऱ्यांना दिले. या मुदतीत रक्कम अदा न झाल्यास कडक कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

तसेच ज्या दिवशी कांदा विकला आहे, त्याच दिवसाचा धनादेश उत्पादकांना देण्याची सूचना व्यापाऱ्यांना उपनिबंधक करे यांनी केली. बैठकीस कृउबा चेअरमन राजेंद्र देवरे, सचिव नितीन जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू पंडित देवरे, संचालक विलास देवरे, बाळासाहेब देवरे, धर्मा देवरे, गोरख कचवे, गणेश देवरे, रामदास साळुंके आदींसह कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

बाजार समितीचे सचिव नितीन जाधव यांनी बैठकीत ठरल्यानुसार कांदा व्यापारी संघटनेस पत्र देऊन शासन निर्देशाप्रमाणे काम करण्याची सूचना केली असून, कांदा ज्या दिवशी विकत घेतला जाईल त्याच दिवसाचा धनादेश उत्पादकांना देण्याची सूचना केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...