agriculture news in marathi, payment distribution status of rojgar hami scheme, satara, maharashtra | Agrowon

सातारा, भंडारा, बुलडाण्यात होतेय `रोहयो`ची १०० टक्के मजुरी वितरीत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

साताऱ्यात रोजगार हमी योजनेतून सध्या वैयक्‍तिक, सार्वजनिक कामे सुरू आहेत. सुमारे साडेपाच हजार मजूर त्यावर कार्यरत आहेत. त्यांना वेळेत मजुरी मिळण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहोत.  
-संजय पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो), सातारा.

सातारा  : मागेल त्याला काम देणारी योजना म्हणून रोजगार हमी योजना ओळखली जाते. या योजनेत वेळेवर मजुरी देण्यात सातारा, भंडारा, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांनी १०० टक्‍के कामगिरी बजावली आहे. ऑनलाइन पद्धतीने मजुरी दिली जात असल्याने थेट मजुरांच्या खात्यावर ती जमा होत आहे. वेळेवर मजुरी देण्यात रायगड जिल्हा राज्यात मागे असून, तेथे केवळ ७०.५२ टक्‍के मजुरांना वेळेवर मानधन मिळत आहे.

रोजगार हमी योजनेत सातारा जिल्ह्याने सातत्यपूर्ण कामगिरी करीत वैयक्‍तिक लाभाची व सार्वजनिक कामांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे मजुरांची संख्याही वाढत आहे. प्रतिमहिना सरासरी सहा हजार मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. यापूर्वी शासकीय स्तरावरून ही मजुरी मिळण्यास वेळ लागत असतो. त्यामुळे अनेक मजूर या कामांकडे पाठ फिरवत होते. आता मात्र ऑनलाइन पद्धतीने मजुरी दिली जात असल्याने मजुरांना वेळेवर मोबदला मिळतो आहे.

साताऱ्यासह भंडारा, बुलडाणा जिल्ह्यातील रोजगार हमी योजना विभागाने १०० टक्‍के मजुरांना वेळेवर मानधन दिले आहे. त्यापाठोपाठ नागपूरने ९९.९६, नंदुरबारने ९९.७७, यवतमाळने ९८.८२, रायगडने ७०.५८, जालन्याने ७४.९२ टक्‍के मजुरांना वेळेत मानधन दिले आहे. राज्याची टक्‍केवारी ९२.११, तर देशाची ९२.१२ टक्‍के आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...