ऑनलाइन वीजबिल भरणा कोणत्याही शुल्काविना

महावितरण
महावितरण

सोलापूर  : ग्राहकांना ऑनलाइनद्वारे आपल्या वीजबिलाचा भरणा सुलभतेने करता यावा व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड, डेबिटकार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे.  

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (www.mahadiscom.in) व महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे ग्राहक वीजबिलाचा ऑनलाइन भरणा करू शकतात. ऑनलाइन वीजबिलाचा भरणा करताना केवळ क्रेडिट कार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येईल. इतर सर्व पद्धतीने वीजबिलाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ऑनलाइन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर Payment History तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com