तुरीचे १४ लाख थकल्याने शेतकऱ्यांची न्यायालयात धाव

तुरीचे १४ लाख थकल्याने शेतकऱ्यांची न्यायालयात धाव
तुरीचे १४ लाख थकल्याने शेतकऱ्यांची न्यायालयात धाव

देगलूर, जि. नांदेड : गतवर्षीच्या येथील नाफेड केंद्राचा सावळा गाेंधळ अद्यापही संपायला तयार नाही. नरंगल केंद्रावर ताेलाई झालेल्या २१ शेतकऱ्यांचे १३ लाख ९८ हजार ८५० रुपये वर्षभरापासून हातात पडायला तयार नसल्याने शेवटी त्या शेतकऱ्यांना न्यायालयात धाव घेण्याची वेळ आलेली आहे.  केंद्रावर दैनंदिन ताेलाईचा अहवाल त्याच दिवशी डी.एम.ओ. कार्यालयाला जाणे क्रमप्राप्त असताना प्रत्यक्षात झालेली ताेलाई व अहवालातील ताेलाई यामध्ये तफावत आल्याने ४८ शेतकऱ्यांचे तुरीचे पैसे थकले हाेते. त्यानंतर २७ शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे प्राप्त झाले. मात्र, २१ शेतकरी यामध्ये अाडकून पडल्याने त्यांना न्यायालयाचा उंबरवठा चढावा लागला.  या सर्व प्रकरणाला जबाबदार काेण, हा तर प्रश्‍न पुढेच राहिला. मात्र, थकलेल्या पैशाला नाेडल एजन्सीचा कारभारच जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. याला वरिष्ठ पातळीवरून दुजाेरा मिळत आहे. शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्राची पूर्तता करून मालाची ताेलाई करूनही त्यांना हक्काच्या पैशासाठी हेलपाटे मारावे लागत असतील तर त्या शेतकऱ्यांनी तरी काेणता गुन्हा केला आहे याचे कुठे तरी मूल्यमापन व्हायला हवे. यात जे काेणी दाेषी असतील त्यांच्यावर कठाेर कार्यवाही केली जाणे गरजेचे आहे. शहापूर - चार शेतकरी, मनसक्करगा (एक), वन्नाळी (दाेन), मेथी (सात), ढाेसणी (एक), येवती (एक), कर्णा (दाेन), कावळगाव (एक), जांभळी (एक), जाहूर (एक) अशा २१ शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरातून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. गतवर्षीच्या हंगामातील देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुगाची दाेन लाख ३० हजार रुपये, तर उडदाची मार्केट फीस १८ लाख ७६ हजार रुपये थकले आहेत. नाफेड केंद्राची नाेडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या नरंगल सेवा संस्थेचे कमिशन थकले असून, यासाठी आम्ही सतत पाठपुरावा चालविला असल्याचे संस्थेचे चेअरमन इरवंतराव पाटील यांनी सांगितले. 

खानापूर केंद्रावर २२५१ क्विंटल ताेलाई  यावर्षी तुरीचे नाफेडचे केंद्र खानापूर येथे ता. पाच फेब्रुवारीला सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात ता. आठ फेब्रुवारीपासून खरेदीला प्रारंभ करण्यात आला. तालुक्यातील ३२०० शेतकऱ्यांनी तुरीसाठी नावनाेंदणी केलेली आहे. ता. २३ फेब्रुवारीपर्यंत १६४ शेतकऱ्याकडून फक्त दाेन हजार २५१ क्विंटल मालाची ताेलाई झालेली आहे. शुक्रवारी (ता. २३) भाजयुमाेचे राजेश पवार यांनी खानापूर केंद्राला भेट देऊन येथील ताेलाईच्या वेग वाढीसाठी संबंधितांना आदेश दिले जाणार असल्याचे सांगितले व लवकरच हरभरा या मालाचीसुद्धा हमीभावानुसार खरेदी सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आत्माराम पाटील, संचालक माधवराव पाटील सुगावकर, अशाेक पाटील मुगावकर, सचिव सतीश मेरगवार यांची उपस्थिती हाेती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com