agriculture news in marathi, PDKV to establish hightech dairy farm | Agrowon

कृषी विद्यापीठ उभारणार देशी गोवंशांचा हायटेक डेअरी फार्म
टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

नागपूर : आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या दिशेने पाऊल टाकत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लवकरच देशी गोवंश संवर्धनाचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या माध्यमातून २०० गाईंचे संगोपन करीत त्यापासून मिळणाऱ्या दुधाची खास ब्रॅण्डने विक्री केली जाणार आहे. 

नागपूर : आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या दिशेने पाऊल टाकत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लवकरच देशी गोवंश संवर्धनाचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या माध्यमातून २०० गाईंचे संगोपन करीत त्यापासून मिळणाऱ्या दुधाची खास ब्रॅण्डने विक्री केली जाणार आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सद्यस्थितीत अकोला येथे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग आहे. कृषी विद्यापीठाला लौकीक मिळवून देणाऱ्या या विभागात सद्यस्थितीत २०० देशी गाईंचे संवर्धन होते. १२२ ते १२५ लिटर दूध या गाईंपासून मिळते. त्याची विक्री कृषी विद्यापीठातील कर्मचारी तसेच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना होते. पूर्वी अतिरिक्‍त दुधाचा पुरवठा अकोला शहरातील नागरिकांनादेखील होत होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दुग्ध विकास विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत कृषी विद्यापीठात लवकरच हायटेक डेअरी फार्मची उभारणी केली जाणार आहे. २०० देशी गाईंची खरेदी नव्याने या प्रकल्पाअंतर्गत केली जाईल. 

आता दुधाचा ब्रॅण्ड 
पाकिस्तानातील थारपारकर तसेच गिर, साहिवाल जातीच्या २०० गाईंची खरेदी कृषी विद्यापीठ करणार आहे. सरासरी दहा लिटर दूध देणाऱ्या या गाईंपासून मिळणारे दूध काढण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर होईल. दुधाची विक्री शहरातील नागरिकांना केली जाणार असून त्याकरीता खास ब्रॅण्ड काढण्याचे प्रस्तावीत आहे.

डेअरी विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. त्याअंतर्गत २०० गाईंची नव्याने खरेदी करून ब्रॅण्डच्या माध्यमातून दुधाची विक्री करण्याचे प्रस्तावीत आहे. त्याकरीता आधुनिक गोठा उभारणीच्या कामास सुरवात झाली आहे.
- डॉ. विलास भाले, कुलगुरू,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...