agriculture news in marathi, PDKV makes mou regarding Turmeric powder processing | Agrowon

अोल्या हळदीपासून एकाच दिवसात होणार पावडर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सामंजस्य करार करण्याचा धडाका सुरू केला अाहे. अाता हळद प्रक्रिया तंत्रज्ञान वापराबाबत विद्यापीठाने दोन कंपन्यांसोबत करार केला अाहे. 

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सामंजस्य करार करण्याचा धडाका सुरू केला अाहे. अाता हळद प्रक्रिया तंत्रज्ञान वापराबाबत विद्यापीठाने दोन कंपन्यांसोबत करार केला अाहे. 

सामंजस्य करार प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्यासह संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, विद्यापीठ नियंत्रक विद्या पवार, संशोधक डॉ. संजय भोयर, डॉ. प्रदीप बोरकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अजय सदावर्ते, तांत्रिक सचिव डॉ. नीरज सातपुते, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, टर्मिजर अॅग्रो प्रोसेसर कंपनी (पुणे) चे एस. एस. मोरे, एस. बी. सावंत, गोपाल ओझा व कंचनी शेतकरी उत्पादक कंपनी (वरोरा, जि. चंद्रपूर) चे अध्यक्ष यशवंत सायरे, संचालक अजय पंचभाई, आर. के. पिशे, डॉ. अनुप वासाडे, नितीन टोंगे उपस्थित होते. सामंजस्य करारावर विद्यापीठाचे वतीने डॉ. संजय भोयर यांनी तर कंपनीच्या वतीने एस. एस. मोरे व यशवंत सायरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. 

या वेळी डॉ. भाले म्हणाले, की बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेती व्यवसायात अनेक स्थित्यंतरे होत अाहेत. अलीकडील काळात स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ठरतील.  पूर्व विदर्भात धान पिकाखालील क्षेत्राची उत्पादकता दिवसेगणिक स्थिरावत असून धानाला पर्यायी पिके लोकप्रिय करण्यात विभागीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रांनी आघाडी घेतली अाहे. यामध्ये कपाशी, भाजीपाला, ऊस, हळद, अद्रक, फळपिके आदी नगदी पिकांचा समावेश अाहे. केवळ उत्पादनावर समाधानी न राहता गाव पातळीवरच प्रक्रिया करीत पक्का माल शहरात विक्रीस उपलब्ध करण्यावर विशेषतः युवा वर्गाने प्रयत्नशील राहावे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून हळदीच्या ओल्या कंदापासून वापरा योग्य हळद पावडर केवळ एका दिवसात करता येणे शक्य होणार अाहे. 

सुधारीत हळद प्रक्रिया तंत्रज्ञानाचे संशोधन डॉ. संजय भोयर यांनी केले असून विद्यापीठाच्या या तंत्रज्ञानाला पेटंट मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. भाले यांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...