पर्लकोटाचा पूल आठव्यांदा पाण्याखाली

पर्लकोटाचा पूल आठव्यांदा पाण्याखाली
पर्लकोटाचा पूल आठव्यांदा पाण्याखाली

भामरागड, गडचिरोली : जवळच्या पर्लकोटा नदीला महापूर आला असून नदी पुलावरून ५ ते ६ फूट पाणी वाहत आहे. या वर्षी जुलै व आॅगस्टमध्ये हा नदी पूल आठव्यांदा पाण्याखाली गेला असून, पुराचे पाणी लगतच्या बाजारपेठेत शिरले आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. भामरागडचा संपर्क तुटला असून, वाहतूक ठप्प झाली आहे.

या वर्षी आॅगस्टच्या १२ तारखेपासून पर्लकोटाचा पूल व पुराचे पाणी यांचा लपंडाव चालला आहे. या महिन्यात हा पूल कधी ५ तर, कधी सहा तास पाण्याखाली राहिला. मंगळवारी (ता. २८) दिवसभर पुराचे पाणी पुलाला लागून होते, त्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री ८ वाजता पाणी पुलावर चढले. बुधवारी सकाळी ५ ते ६ फूट पाणी पुलावर असून पूर वाढतच आहे. बुधवारी भामरागडचा आठवडी बाजार असतो. बहुतेक भाजी विक्रेते अहेरी, आलापल्ली परिसरातील असल्याने व वाहतूक ठप्प झाल्याने आठवडी बाजारही भरणार नाही. दोन दिवसांपासून पाऊस नसतानाही पूर आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com