प्रलंबित कृषिपंपांच्या वीजजोडणीचा मार्ग सुकर

प्रलंबित कृषिपंपांच्या वीजजोडणीचा मार्ग सुकर
प्रलंबित कृषिपंपांच्या वीजजोडणीचा मार्ग सुकर

सोलापूर  : मार्च २०१८ अखेर प्रलंबित असलेल्या कृषिपंप ग्राहकांना उच्चदाब वीज यंत्रणेतून वीजजोडणी मिळावी, यासाठी महावितरणतर्फे निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. देशातील नामांकित कंपन्यांनी त्यात चांगला सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे या कामाला गती मिळाली आहे. या सर्व प्रलंबित कृषिपंपांना वीजजोड मिळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला असून सोलापूरसह अौरंगाबाद, जालना लातूरला त्याचा फायदा होणार आहे.

राज्यातील कृषिपंप ग्राहकांना उच्चदाब वीज यंत्रणेतून वीजजोडणी देण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया यापूर्वी स्थानिक पातळीवर राबविण्यात आली. स्थानिकांना कामे मिळावेत या उद्देशाने ही निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती. परंतु स्थानिक कंत्राटदारांनी या कामासाठी जास्त मोबदला मिळावा म्हणून ही कामे स्वीकारली नाहीत. शेवटी महावितरणने या कामासाठी मोठ्या कंपन्यांना निमंत्रित केले. 

नामांकित कंपन्यांनी या कामासाठी आपला सहभाग नोंदविला असून यात प्रामुख्याने टाटा प्रोजेक्‍ट, नागार्जुन कन्स्ट्रक्‍शन कंपनी, एल अँड टी, होल्टास, अग्रवाल पॉवर कंपनी लि, भारत इलेक्‍ट्रिकल्स आदी कंपन्यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी या प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नाही, त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या कंपन्यांना निमंत्रित करण्याचा महावितरणचा मानस आहे.

महावितरणच्या औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नंदूरबार, धुळे व जळगाव या मंडलांतील कामे ‘फूल टर्नकी` तत्त्वावर करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता ५ ते ८ निविदा महावितरणला प्राप्त झाल्या आहेत. नामांकित कंत्राटदारांच्या सहभागामुळे आता उच्चदाब वीज यंत्रणेतून शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याच्या कामाला गती मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com