agriculture news in marathi, Pending FRP may reach forty thousand crore | Agrowon

‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत जाणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या थकीत ‘एफआरपी’चा आकडा पुढील तीन महिन्यांत ४० हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटी, तर उत्तर प्रदेशात १२ हजार कोटी रुपये वाटण्यात आलेले नाही. गेल्या हंगामापेक्षा थकीत एफआरपी दहा हजार कोटीने जादा आहे. डिसेंबरपर्यंत गेल्या हंगामात थकीत एफआरपीचा आकडा दहा हजार कोटीचा होता. यंदा १९ हजार कोटी आताच थकलेले आहेत. हा आकडा पुढील तीन महिन्यांत ४० हजार कोटींवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या थकीत ‘एफआरपी’चा आकडा पुढील तीन महिन्यांत ४० हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटी, तर उत्तर प्रदेशात १२ हजार कोटी रुपये वाटण्यात आलेले नाही. गेल्या हंगामापेक्षा थकीत एफआरपी दहा हजार कोटीने जादा आहे. डिसेंबरपर्यंत गेल्या हंगामात थकीत एफआरपीचा आकडा दहा हजार कोटीचा होता. यंदा १९ हजार कोटी आताच थकलेले आहेत. हा आकडा पुढील तीन महिन्यांत ४० हजार कोटींवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिल्लीत पुन्हा साखर उद्योगातील प्रतिनिधींशी तीनच दिवसांपूर्वीच चार तास चर्चा केली. विविध राज्यांनी मांडलेले चित्र बघता ‘एफआरपी’ची समस्या अतिशय गंभीर वळणावर जाण्याची शक्यता आहे, असा पुन्हा एकदा इशारा श्री. पवार यांनी या वेळी दिला. 

देशातील अतिरिक्त साखरेच्या निर्यातीत सातत्याने येत असलेले अपयश, चालू हंगामात होणारे भरपूर उत्पादन, कोसळलेले साखर बाजार यामुळे कारखाने आर्थिक संकटात आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात देशभर अडचणी तयार झाल्या आहेत.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, श्री. पवार सातत्याने साखर उद्योगातील समस्येचा आढावा घेत आहेत. इस्माचे अध्यक्ष रोहित पवार, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रीय साखर कारखाने संघाचे अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांच्यासह विविध राज्यांमधील प्रतिनिधींशी त्यांनी पुन्हा चर्चा करून आढावा घेतला.

साखर उद्योगातील अन्य समस्यांचे नंतरदेखील बघता येईल, पण ४० हजार कोटींवर थकबाकी जाणार असल्यास मला शेतकऱ्यांची जास्त चिंता वाटते. ही भयावह स्थिती विचारात घेता सरकारने तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे श्री. पवार यांनी नमूद केले, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

---चौकट---
साखर पट्ट्यात ५० मतदारसंघ
‘उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील ५० लोकसभा मतदारसंघांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रभाव आहे. ‘एफआरपी’मुळे तयार झालेल्या फटका सरकारला लोकसभा निवडणुकांमध्ये बसू शकेल,’ असा राजकीय अंदाजही सूत्रांनी व्यक्त केला. 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...