देशभरात पेन्शनर्सची संख्या दोन लाखांनी वाढणार

पेन्शनर्सची संख्या दोन लाखांनी वाढणार
पेन्शनर्सची संख्या दोन लाखांनी वाढणार

मुंबई ः  पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे देशभरात दोन लाख ६० हजार सदस्य आहेत. सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे नजीकच्या काळात आणखी दोन लाख पेन्शनधारक वाढतील, असा विश्‍वास पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाचे (पीएफआरडीए) अध्यक्ष हेमंत कॉन्ट्रॅक्‍टर यांनी व्यक्त केला. जागतिक व्यापार केंद्र मुंबई आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाला (पीएफआरडीए) केंद्र सरकारने २०१४ मध्ये सूचित केल्यानुसार या फंडाचे मुख्य उद्दिष्ट हे निवृत्तिवेतनाचे नियमन ठेवणे आणि लोकांच्या सामाजिक सुरक्षेला प्राधान्य देणे हे आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत अटल पेन्शन योजना, आयुष्मान योजना, 'ईपीएफओ', 'ईएसआयएससी', ग्रॅच्युइटीआधारित फंड, मॅटर्निटी फंड यांचा समावेश होतो. या फंडांची रचना अशी करण्यात आली आहे की त्यापैकी काहींतून ग्राहकांना करबचत करता येते. ही सुविधा इतर पेन्शन फंडांमध्ये उपलब्ध नाही. 'सॉफ्ट पेन्शन'चा मानस सध्या साधारणपणे आपल्या देशात १२ कोटी लोक हे ६० वर्षांवरील आहेत. २०३० पर्यंत हा आकडा १८ कोटी व २०५० पर्यंत तो ३० कोटींवर पोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा आकडा लक्षात घेऊन 'सॉफ्ट पेन्शन' योजना तयार करण्याचा सरकारचा मानस असल्याचे कॉन्ट्रॅक्‍टर यांनी सांगितले. परदेशांत स्वयंचलित नोंदणी इंग्लंड, तुर्कस्तान, न्यूझीलंड या देशांमध्ये स्वयंचलित नोंदणी (ऑटो इन्‍रोलमेंट) यंत्रणा कार्यरत असून, भारतामध्ये मात्र अद्याप ऑटो इन्‍रोलमेंट नाही. त्यामुळे नव्या पेन्शनच्या नोंदणीत अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com