agriculture news in marathi, People's representatives should take the initiative to start the Tembhu scheme | Agrowon

टेंभू योजना सुरू करण्यास लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

सांगली : दुष्काळी भागातील महत्त्वाची असणारी टेंभू उपसा सिंचन योजना अद्यापही सुरू होण्याची चिन्हे नाहीत. जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यात पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शेतकरी   टेंभू योजना सुरू करण्याची मागणी करू लागले आहेत. मात्र, टेंभू सिंचन योजनेची पन्नास टक्के वीजबिल थकबाकी भरल्याशिवाय ही योजना सुरू होणार नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सध्या पाण्याची गरज लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

सांगली : दुष्काळी भागातील महत्त्वाची असणारी टेंभू उपसा सिंचन योजना अद्यापही सुरू होण्याची चिन्हे नाहीत. जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यात पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शेतकरी   टेंभू योजना सुरू करण्याची मागणी करू लागले आहेत. मात्र, टेंभू सिंचन योजनेची पन्नास टक्के वीजबिल थकबाकी भरल्याशिवाय ही योजना सुरू होणार नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सध्या पाण्याची गरज लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील घाटमाथ्यावर या योजनेचे पाणी यायला अजून सहा महिने लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. टंचाईच्या काळात सुरू केलेल्या या योजनेचे वीजबिल शासन भरणार आहे. त्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हा प्रस्ताव कधी मंजूर होणार आहे, याबाबत अद्यापही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगणे कठीण आहे. परंतु सध्या पाण्याची गरज लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

टेंभू सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात २३४ गावांतील ८० हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश झाला आहे. आजही टेंभूचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे टेंभू सिंचन योजनेच्या अपूर्ण असलेल्या कामांसाठी निधी आणण्यात व्यस्त आहेत. निधी आल्याने अपूर्ण कामे पूर्ण होण्यास मदत होईल. नव्याने समाविष्ट २२ गावांना सहा महिन्यांनी पाणी मिळणार आहे. पण ज्या भागात पहिल्यापासून टेंभूचे पाणी मिळते आहे, त्या गावांना अगोदर पाणी द्या, अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र, टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोडण्यासाठी लोकप्रतिनिधी शासनाकडे मागणी करणार का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

नव्याने समाविष्ट गावांना सहा महिन्यांनी पाणी
टेंभू सिंचन योजनेत आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील २२ गावे समावेश झाली आहेत. यासाठी २०० कोटी रुपये मिळाले आहेत. त्या गावांना पाणी मिळण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या गावांतील पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

इतर बातम्या
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...