agriculture news in marathi, perceasing of cereals below msp, Maharashtra | Agrowon

कडधान्याची कमी दरात सर्रास खरेदी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

कडधान्याची हमीभावापेक्षा अतिशय कमी दरात खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांची लूट सुरू असून, दर हमीभावापेक्षा फक्त २०० ते ३०० रुपये कमी द्यावेत. कमी दर्जाच्या शेतीमालाचे दर किती द्यावेत, हेदेखील शासकीय यंत्रणांनी ठरवावे. कारण कमी दर्जा सांगितला की मग ३५००, ४००० रुपये दर देण्याचे प्रकार सुरू आहेत. 
- रावण पाटील, शेतकरी, पाचोरा

जळगाव ः जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, पाचोरा, अमळनेरसह धुळ्यातील दोंडाईचा, शिरपूर आदी बाजार समित्यांमध्ये कडधान्याची हमीभापेक्षा अतिशय कमी दरात सर्रास खरेदी सुरू आहे. संबंधित जिल्ह्यांमधील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडून कमी दरात खरेदीबाबतचे संमतीपत्र भरून घेण्याची मुभा दिल्याने व कमी दर्जाचे धान्य ठरविण्यासाठी समित्यांचा खेळ केल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक यंदाही सुरू झाली आहे. 

दरांची हमी तर नाहीच; मागील वर्षी जशी स्थिती उडीद, मुगात होती, त्यापेक्षा बिकट स्थिती यंदा झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहेत. मुगाला किमान ३५०० व कमाल ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर जळगाव, चोपडा येथील बाजारात मिळत आहे. तर या दोन्ही बाजार समित्यांमध्ये उडदाला ३८०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहेत. मुगाला केंद्राने ६९७५, तर उडदाला ५६०० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला आहे. दर जाहीर केले, दरांची हमी मात्र दिलेली नसल्याची नाराजी ग्रामस्थ, शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात उडदाची जळगाव, चोपडा, पाचोरा व अमळनेर या बाजार समित्यांमध्ये मिळून प्रतिदिन दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक मागील तीन चार दिवसांपासून सुरू आहे. तर मुगाची प्रतिदिन ७०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर या बाजार समित्यांमध्ये अधिकची उलाढाल होत आहे. तर धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्‍यातील दोंडाईचा, शिरपूर व धुळे बाजार समितीमध्ये मोठी आवक सुरू आहे. 

शेतकऱ्यांची कोंडी
उडीद व मुगाचे हमीभाव वाढविल्याने दर चांगले मिळतील, असे चित्र सुरवातीला होते. यातच खानदेश व्यापारी संघटनेने मध्यंतरी राज्याच्या पणनमंत्री यांना हमीभाव वाढविल्याने यंदा उडीद व मुगाची हमीभावात खरेदी शक्‍य नसल्याचे पत्र दिले. लागलीच दोंडाईचा बाजार समितीनेही आपल्याला शासनाने हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीचे पत्रच शासनाने द्यावे, त्याशिवाय खरेदी करणे अडचणीचे होईल, असा पवित्रा घेतला. तर जळगाव येथेही व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली. नंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने व्यापारी कमी दर्जाचे (नॉन एफएक्‍यू) धान्य हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करू शकतील. नॉन एफएक्‍यू धान्य कोणते ते ठरविण्यासाठी बाजार समितीमधील सचिव, संबंधित तालुक्‍याचे कृषी अधिकारी व सहायक निबंधक यांची समिती गठित केली. ही समिती बाजार समितीत काम करते का, असा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अमळनेर बाजार समितीत मुगाची हमीभावापेक्षा कमी दरात सर्रास खरेदी सुरू असून, शेतकऱ्यांकडून संमतीपत्र लिहून घेतले जात आहे. व्यापाऱ्यांनी दर पाडून खरेदीची खेळी यशस्वी केली आहे. अर्थातच या समित्या व संमतीपत्रांच्या नावाने जिल्ह्यात हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीची मुभा देऊन शासकीय यंत्रणांनी ही लूट करायला मार्ग मोकळे केल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

इतर बातम्या
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
शेतीपूरक व्यवसायातून वर्षभर उत्पन्नाची...नांदेड  ः एकात्मिक शेती पद्धती अंतर्गत...
मराठवाड्यात हुमणीचा १७ हजार हेक्‍टरला...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
कोल्हापुरात आठ हजार एकरांवर हुमणीचा...कोल्हापूर : पावसाने दिलेली दडी व प्रतिकूल...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
द्राक्षपट्ट्याला दुष्काळाचे ग्रहणसांगली ः गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय......
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...