Agriculture News in Marathi, perishable agri crop will get remunerative rate, report will submit to govt shortly, said cooperative minister subhash deshmukh, maharashtra | Agrowon

नाशवंत शेतमालासंदर्भातील समितीचा अहवाल लवकरच
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नागपूर : नाशवंत शेतमालाचे पीक घेणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर राज्य सरकारला सादर होईल, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. २०) विधानसभेत दिली.

नागपूर : नाशवंत शेतमालाचे पीक घेणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर राज्य सरकारला सादर होईल, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. २०) विधानसभेत दिली.

आमदार अस्लम शेख यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी आमदार शेख म्हणाले, की आठ महिन्यांपूर्वी राज्य सरकारने समितीची घोषणा केली होती. मात्र, अजूनही अहवाल मिळालेला नाही. सुविधेअभावी नाशवंत पिकांमध्ये शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सरकार आवश्यक त्या ठिकाणी गोदामे, शीतगृह उभारणार आहे का, असा सवालही त्यांनी केला.

हरिभाऊ जावळे म्हणाले, की केळी हे सर्वाधिक नाशवंत पीक आहे. राज्यात जळगावसारख्या भागात हजारो कोटी रुपयांच्या केळीचे पीक घेतले जाते. तरी या समितीला जळगावला भेट द्यावी वाटली नाही. तसेच रावेर, यावल येथे राज्य सरकारने दहा कोटी खर्च करून उभारलेला प्रकल्प धूळ खात पडला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी समितीने मराठवाड्यात एकाही ठिकाणी भेट दिली नसल्याचे स्पष्ट केले. मंत्री फक्त मोघम उत्तर देतात, ठोस अहवाल कधीपर्यंत देणार याची माहिती द्या. तसेच राज्यभर विभागनिहाय बैठका घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. दीपिका चव्हाण, भीमराव धोंडे यांनी या वेळी प्रश्न विचारले.

त्यावर मंत्री देशमुख म्हणाले, की पणन संचालकांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यांची समिती नेमली आहे. समितीने पुणे, नाशिक, वर्धा, सोलापूर या ठिकाणी पाच बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये परिसरातील लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञांकडून आलेल्या सूचना, शिफारशींसह सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

लवकरात लवकर हा अहवाल तयार होईल. त्यानंतर आवश्यक उपाययोजना केल्या जातील. बागडे यांच्या सूचनेनुसार जळगावला बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, अहवाल सादर करण्यासाठी ठोस मुदत देण्याचे त्यांनी टाळले.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...