agriculture news in Marathi, permission of that fodder camp cancel, Maharashtra | Agrowon

‘त्या’ चारा छावणीची मान्यता रद्द
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मे 2019

बीड : शेतकऱ्यांचा खोटा पुळका दाखवत सुरवातीला जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, अशा आरोळ्या ठोकणाऱ्या काही छावणीचालकांनी जनावरांचे खोटे आकडे टाकून आणि चाऱ्याला काट मारून सुरवातीला खाबूगिरी केली. ही खाबूगिरी पचल्यानंतर आता थेट दंडाधिकारीय अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांसोबत दादागिरी करण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे. कोल्हारवाडी (ता. बीड) येथील मत्स्यगंधा संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या चारा छावणीची मान्यता रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांनी छावणीचालकांच्या खाबूगिरीला लगाम घातला आहे. मात्र दादागिरीचे काय, असा प्रश्न आहे.

बीड : शेतकऱ्यांचा खोटा पुळका दाखवत सुरवातीला जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, अशा आरोळ्या ठोकणाऱ्या काही छावणीचालकांनी जनावरांचे खोटे आकडे टाकून आणि चाऱ्याला काट मारून सुरवातीला खाबूगिरी केली. ही खाबूगिरी पचल्यानंतर आता थेट दंडाधिकारीय अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांसोबत दादागिरी करण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे. कोल्हारवाडी (ता. बीड) येथील मत्स्यगंधा संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या चारा छावणीची मान्यता रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांनी छावणीचालकांच्या खाबूगिरीला लगाम घातला आहे. मात्र दादागिरीचे काय, असा प्रश्न आहे.

गुरुवारी (ता. नऊ) कोल्हारवाडी (ता. बीड) येथील चारा छावणी तपासणीसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना रोखण्याचे धाडस आणि अडथळा आणण्यासाठी थेट विद्युत खंडित करण्याच्या प्रकाराने प्रशासनासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

सामान्यांनी एखाद्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली, तरी त्याच्यावर शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा नोंद होतो. या ठिकाणी तर दंडाधिकारीय अधिकार असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना रोखण्यापर्यंत मजल मारली गेली. एवढेच नाही, तर तपासणीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस फौजफाटा तैनात करण्याची वेळ आली, तरीही प्रशासन यावर ठोस कारवाई का करत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, छावणीचालक संघटनेनेही अशा प्रकारांना पाठीशी घातले जाणार नसून, बोगसगिरी आणि दादागिरीवर कारवाईची मागणी केली आहे.

सुरुवातीला शासनाने दावणीला चारा देण्याचा मानस व्यक्त करताच शेतकऱ्यांचे तथाकथित तारणहार पुढे आले आणि छावण्यांतूनच चारा देण्याची मागणी करू लागले. शेतकऱ्यांच्या जनावरांपेक्षा दुष्काळातून मलिदा खाण्यासाठीच ही तळमळ होती हे आता लपून नाही. सध्या जिल्ह्यात आठशेंवर चारा छावण्यांना मंजुरी असून, सहाशेंवर चारा छावण्यांत चार लाखांवर जनावरे आहेत. मात्र, यातील खरे जनावरे किती आणि कागदी किती, हा संशोधनाचा विषय आहे. 

दरम्यान, छावण्यांत चारा देण्याच्या निकषालाही फाटा देण्यात येत आहे. याबाबतच्या तक्रारीवरून खुद्द जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी चारा छावण्यांना दिलेल्या भेटीतही हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पाच उपविभागीय अधिकाऱ्यांना बीड आणि आष्टी तालुक्यातील चारा छावण्यांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले. 

उपविभागीय अधिकारी शोभा जाधव कोल्हारवाडीच्या चारा छावणीत पोचल्यानंतर त्यांना तपासणीपासून तब्बल तासभर रोखले. छावणी तपासणी होऊन काळंबेरं उघड होऊ नये म्हणून विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला. छावणीचालकाच्या या मुजोरीनंतर पोलिस बंदोबस्त बोलावून छावणीची तपासणी झाली. तसेच, विद्युत पुरवठा खंडित असल्याने अधिकाऱ्यांना बॅटरीच्या प्रकाशात तपासणी करावी लागली. प्रशासनाने पोलिस बंदोबस्त आणि बॅटरीचा प्रकाश वापरला असला, तरी या मुजोरीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा छावणीतील जनावरांतील तफावतीमुळे या छावणीची मान्यता शुक्रवारी रद्द करण्यात आली. आता प्रशासन या मंडळींची दादागिरी कशी रोखते, याकडे लक्ष लागले आहे.

बोगसगिरी, दादागिरीचे समर्थन नाही
शेतकऱ्यांच्या जनावरांना नियमानुसार चारा व पाणी भेटले पाहिजे. आमच्याही मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य व्हावे. बोगसगिरी आणि दादागिरीचे छावणीचालक संघटना समर्थन करणार नाही, अशी भूमिका अध्यक्ष अशोक हिंगे यांनी मांडली.
 

इतर अॅग्रो विशेष
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...
SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात...- सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात...
रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापनवनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...
राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणारनागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे...
राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासूनजळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड...
दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा (video...औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो...
Breaking : मॉन्सून अंदमानात दाखलपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८)...
बिगर नोंदणीकृत जैविक उत्पादनात खत...पुणे : शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या बिगर...