केजरीवाल यांच्या सिंदखेड राजा येथील सभेला परवानगी

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

बुलडाणा  ः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शुक्रवारी (ता.१२) होऊ घातलेल्या सभेला सुरक्षेच्या दृष्टीने नाकारण्यात अालेली परवानगी देण्यात अाली. केजरीवाल यांची सभा सिंदखेडराजा येथील शिशमहलच्या मागे असलेल्या टी पाॅइंटजवळ घेता येणार अाहे.  श्री. केजरीवाल यांच्या सभेबाबत सुरवातीपासूनच संभ्रम तयार झाला होता. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या या सभेला शनिवारी (ता. सहा) बुलडाणा पोलिसांनी परवानगी नाकारली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नाकारण्यात आलेल्या परवानगीनंतरही आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता.   शुक्रवारी (ता.१२) सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाचा सोहळा होणार अाहे. या निमित्त सिंदखेडराजा येथील जिजाऊसृष्टीवर महाराष्ट्रासह विविध प्रदेशांतून मोठ्या संख्येने जिजाऊभक्त येतात. आम आदमी पार्टीने याच दिवशी सिंदखेडराजा येथील भगवानबाबा महाविद्यालयाच्या प्रांगणावर सभेचे आयोजन केले होते. दरम्यान, सदर सभेचे ठिकाण जिजाऊसृष्टीपासून हाकेच्या अंतरावर असल्याने व सिंदखेडराजा-जालना मार्गावर जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांचीही गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. परिस्थितीवर नियंत्रणात ठेवणे पोलिस प्रशासनाला अवघड जाईल, हे कारण देत सदर परवानगी नाकारण्यात अाली होती.  दरम्यान, जागेची पाहणी करून पोलिसांनी अाता अरविंद केजरीवाल यांच्या सभेला परवानगी दिली अाहे. ‘अाप’चे कार्यकर्ते या दृष्टीने कामाला लागले अाहेत. दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही सभा होणार असल्याचे अापचे संयोजक लक्ष्मण कोल्हे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com