agriculture news in Marathi, permission for unregistered agriculture inputs sell for sometime, Maharashtra | Agrowon

बिगर नोंदणीकृत निविष्ठांच्या विक्रीचा मार्ग तूर्त मोकळा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 मार्च 2018

पुणे ः बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठा परवानाधारक कृषी सेवा केंद्रांमधून ठेवण्यास व विक्री करण्यास शासनाने घातलेल्या बंदीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे या उत्पादनांची विक्री कृषी सेवा केंद्रांमधून करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पुणे ः बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठा परवानाधारक कृषी सेवा केंद्रांमधून ठेवण्यास व विक्री करण्यास शासनाने घातलेल्या बंदीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे या उत्पादनांची विक्री कृषी सेवा केंद्रांमधून करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे यांनी याबाबत ॲग्रोवनला माहिती दिली. मागील वर्षीच्या तीन आॅक्टोबरला राज्य शासनाने जीआर प्रसिद्ध केला. त्याद्वारे राज्यातील परवानाधारक कृषी विक्री केंद्रांमधून बिगरनोंदणीकृत उत्पादनांच्या विक्रीस बंदी घातली होती. संबंधित संघटनेने शासनाच्या या आदेशाविरुद्ध एक नोव्हेंबर (२०१७) रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या. त्यानंतर एक मार्च रोजी न्यायालयाने शासनाच्या आदेशास अंतरिम स्थगिती देत बिगरनोंदणीकृत निविष्ठांच्या विक्रीवरचे बंधन उठविले आहे. 

निविष्ठा उत्पादकांना दिलासा शासनाने बिगर नोंदणीकृत उत्पादनांना नियमावली व अटींच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी (रेग्युलेशन) आॅगस्ट २०१० मध्ये ‘जीआर’ काढला होता. त्या वेळी गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी ‘जीआर’चा आधार घेत कृषी विक्री केंद्रांनी ही उत्पादने विक्रीस ठेवू नये यासाठी बंधने घालण्यास सुरवात केली होती. त्यानंतर आजगायत शासन व बिगरनोंदणीकृत निविष्ठा उत्पादक यांच्यातील न्यायालयीन लढाई अद्याप सुरू आहे.

न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे राज्यातील बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला  असल्याचे ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष धुरगुडे यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...