agriculture news in Marathi, pest and disease attack on turmeric, Maharashtra | Agrowon

हळद पिकावर कीड-रोगांचा हल्ला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

एक एकर हळदीपैकी २५ टक्के क्षेत्रावरील हळदीची पाने करपून गेली आहेत. पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
- नागेश वरवटे, शेतकरी, रावधानोरा, ता. उमरी, जि. नांदेड.

परभणी : सततच्या पावसामुळे हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील प्रमुख नगदी पीक असलेल्या हळद पिकावर हुमणी, कंदमाशी या किडींसोबतच पर्णकरपा, मर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हळद उत्पादकांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार हे निश्चित आहे.

हिंगोली, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा ओढा हळद पिकाकडे वाढला आहे. केळी, ऊस या पिकांना जास्त पाण्याची गरज असलेल्या त्यापेक्षा तुलनेने कमी पाण्यात किफायतशीर उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून या भागातील शेतकरी हळदची लागवड करत असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे.

हिंगोली हा प्रमुख हळद उत्पादक जिल्हा असून, यंदा या जिल्ह्यात २५ हजार ४९६ हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ नांदेड, परभणी जिल्ह्यात हळद लागवडीचे क्षेत्र आहे. गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस झाला. सततचा पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे अनेक कीडी, बुरशीजन्य रोगांनी डोके वर काढले आहे. 

साधारणतः १५ सप्टेंबरनंतर हळद पिकांवर कंदकूज, पर्णकरपा आढळून येतो. पर्णकरप्याचे लवकर येणारा तसेच उशिरा येणारा, असे दोन प्रकार आहेत. यंदा दोनही प्रकारचे पर्णकरपे एकाच वेळी आले आहेत. पर्णकरप्यामुळे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. मात्र कंदमाशीने हळद कंद पोखरल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कंदकूज होते. कंदकूजमुळे संपूर्ण पीक नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो.

अनेक भागांत मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सुप्त अवस्थेतील हुमणी किडीच्या वाढीसाठी पोषक वातारवरण मिळाल्यामुळे हळदीसह अन्य पिकांवरदेखील हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अनेक गावाशिवारांतील, औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा मंडळातील गोजेगाव, येळी, रुपूर, धार, साळणा या गावशिवारांतील, तसेच नांदेड जिल्ह्यातील हळदीवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळदीचे मोठे नुकसान झाले आहे. कीड, रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार कीटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया
कंदकूजमुळे हळदीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यंदा दोन्ही प्रकारचे करपे एकाचवेळी आढळून आले आहेत. कीड, रोगामुळे उत्पादनात घट येणार आहे.
- डाॅ. के. टी. आपेट, वनस्पती विकृतिशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी.

परतीच्या पावसानंतर मोठ्या प्रमाणावर धुके पडले. त्यामुळे हळदीवर करपा, खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नुकसान झाले आहे. कीड, रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभागाने हळद उत्पादकांना मार्गदर्शन करावे.
- विश्वनाथराव नागरे, शेतकरी, गोजेगाव, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली

 

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...