रोग-किडींमुळे कापूस उत्पादकांना १५ हजार कोटींचा फटका

रोग-किडींमुळे कापसाला १५ हजार कोटींचा फटका
रोग-किडींमुळे कापसाला १५ हजार कोटींचा फटका

शेतकरी मेटाकुटीस, नुकसानीचा पंचनामा आणि मदतीची मागणी पुणे : महाराष्ट्रात कधी नव्हे, इतके मोठे संकट यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर घोंघावत आहे. राज्याचे मुख्य पीक असलेल्या कापसावर बोंडअळीसह इतर रोग-किडींचा ३० ते १०० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव झाल्याने पीक नुकसान १५ हजार कोटींच्याही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रतिकूल हवामानाने फवारण्यांसह उत्पादन खर्चातही मोठी वाढ केली असून, कापूस काढणीचा दरही यंदा १० ते २० रुपयांदरम्यान अाल्याने संकट अधिक गहिरे झाले आहे. अशातच उशिराचा मॉन्सून आणि बेमोसमी पावसानेही काढणी अवस्थेतील कापसाचे मोठे नुकसान केल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कपाशीवरील रोग-कीडींचे संकट

  •  गुलाबी बोंडअळी
  •  दहिया आणि जिवाणूजन्य करपा रोग
  •  लाल ढेकूण
  •  लाल्या विकृती
  •  कापूस बोंडावरील पाऊस
  • राज्यात एकूण खरीप क्षेत्रापैकी कापसाचे सर्वांत मोठे ३० टक्के क्षेत्र आहे. यापैकी विदर्भ, मराठवाडा अाणि खानदेशाचे मिळून ९७ टक्के क्षेत्र कापूस क्षेत्राने व्यापले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ११ टक्के अधिक कापूस क्षेत्रात वाढ झाली. यातही ९८ टक्क्यांपर्यंत बीटी कापसाचे क्षेत्र आहे. बीटी कापूस वाणात बोंडअळीस प्रतिकार करण्याची क्षमता असते. मात्र काही वर्षांपूर्वी बीटी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येण्यास प्रारंभ झाला. अळीची प्रतिकार क्षमता वाढत गेल्याने यंदा बीटी कपाशीवर ती सर्वांत मोठी कीड ठरली आहे. बोंडअळीचे नियंत्रण हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांत प्रचंड अस्वस्था निर्माण झाली आहे. उत्पन्न मिळणे दूरच गुंतवलेले भांडवल निघणे मुश्‍किल झाल्याचे आणि नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

  • एकूण कापूस लागवड : ४२ लाख ६६४४ हेक्टर
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची वाढ : ११ टक्के
  • मराठवाडा-खानदेश-विदर्भातील लागवड क्षेत्र :   ४० लाख ७७ हजार २८४ हेक्टर (९७ टक्के)
  • कापसाचे नुकसान : ३० ते १०० टक्के : सरासरी ४० टक्के 
  • हमीभाव : ४३५० रुपये प्रति क्विंटल
  • येत्या काळात कापूस उत्पादकांमध्ये हाहाकार उडालेला बघायला मिळू शकतो. सध्या तरी या कापूस उत्पादकांचे गाऱ्हाणे एेकायलाही कुणी बांधावर जात नसल्याची दुर्दैवी स्थिती अाहे. शासनाने बियाणे कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हेच नोंदवावेत. - रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना बोंडअळीमुळे कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. शासनाने या परिस्थितित कापूस उत्पादकांना सरसकट नुकसानभरपाई दिली पाहिजे ही स्वाभिमानीची मागणी आहे. - रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना नव तंत्रज्ञानाचे आम्ही नेहमी स्वागत केले अाणि करत राहणार. बोंडअळी प्रतिकारक्षम बीटी कापसाला आम्ही प्राधान्य दिले. यंदा मात्र आमच्या परिसरात ५० ते १०० टक्क्यांपर्यंत कापसावर बोंडअळी आली आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहेच, परंतु यास नव तंत्रज्ञान वापरून प्रतिकारक वाण पुन्हा देण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. - गणेश नानोटे, कापूस उत्पादक शेतकरी, अकोला साडेतीन एकरांत आजवर एकच वेचणी झाली. चार क्‍विंटलच कापूस निघाला. कपाशी चांगली दिसते, पण एकही बोंड शेंदरी बोंडअळीनं कामाचं ठेवलं नाही, काय करावं.  - विठ्ठल चव्हाण, कपाशी उत्पादक शेतकरी, वजनापूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com