agriculture news in Marathi, Pest attack on Banana and Gram in Khandesh, Maharashtra | Agrowon

खानदेशात केळी, हरभऱ्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

ढगाळ हवामानामुळे हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. आम्हाला सतत फवारण्या कराव्या लागत आहेत. त्यासाठी खर्च येत असून, उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. 
- सुभाष काळे, शेतकरी, कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ, जि. जळगाव.

जळगाव  ः धुळ्यासह जळगाव जिल्ह्यांत मागील तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. यामुळे केळीसह हरभरा पिकावर कीड - रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच तापमानातही वाढ झाली असून, या प्रतिकूल स्थितीचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. 

अनेक भागात अजून गहू निसवलेला नाही. हरभरा घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. काही भागातील आगाप लागवडीच्या हरभऱ्याचे घाटे पक्व होत आहेत. अशात तापमानवाढ, ढगाळ वातावरण याचा फटका या पिकाला बसत आहे. घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. गव्हावरही चिकटा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण नसल्याने चार ते पाच महिने कालावधीच्या केळीवर करपा रोग वाढत आहे. ढगाळ वातावरण व त्यातच थंड वारे यामुळे घड पक्व होत नसल्याचे चित्र आहे. पाच ते सहा महिने कालावधीच्या केळी बागांमध्ये करपा रोगाचे प्रमाण चार ते पाच पाने एवढे आहे.

धुळ्यासह जळगावात मागील चार पाच दिवसांपासून थंडी कमी होत आहे. कमाल तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत आले आहे. पुढे तापमानात आणखी वाढ होईल, असे संकेत हवामानशास्त्र विभागाकडून मिळाले आहेत. थंडी कमी झाल्याने हरभरा व गहू यांचे सिंचन करण्याचे काम वेगात सुरू आहे. मागील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्येही ढगाळ वातावरण होते. अगदी २५ डिसेंबरपर्यंत प्रतिकूल हवामान होते. नंतर स्वच्छ वातावरण झाले.

आता शनिवारपासून (ता.१३) आणखी ढगाळ वातावरण आहे. अर्थातच फक्त १९ दिवस थंड व स्वच्छ वातावरण होते. त्याचा लाभ हरभरा व गव्हाला काही प्रमाणात झाला. धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात खरिपात कुठलेही पीक चांगले आले नाही. कपाशीची तर पुरती वाताहत गुलाबी बोंडअळीमुळे झाली. अशात आता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हरभरा प्रमुख पीक आहे. तर केळी पिकावर तापीकाठावरील अनेक गावांचे अर्थकारण अवलंबून आहे. ही दोन्ही पिके प्रतिकूल हवामानामुळे संकटात असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

इतर बातम्या
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...