कपाशीवरील कीड-रोग म्हणजे कृषी विभागाचे अपयश
विनोद इंगोले
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

बीटी बियाण्यासोबतच नॉनबीटी बियाण्याचे पाकिट दिले जाते. शेतकरी ते फेकून देतात. चीनमध्ये २० टक्‍के रिफ्युजीचा वापर होतो. त्यामुळे आजही त्या ठिकाणी बीजी-१ या तंत्रज्ञानाचाच वापर होत आहे. बीजी-२ हे तंत्रज्ञान अवघ्या पाच वर्षांतच कीडरोगाला बळी पडले हेदेखील सत्य नाकारता येत नाही. यापुढे बीटी बियाण्यातच नॉनबिटी मिक्‍स करून देण्याचे प्रस्तावित आहे.
- प्रभाकर राव, अध्यक्ष, नॅशनल सीड्स असोसिएशन ऑफ इंडिया.

यवतमाळ ः बीटी लागवड क्षेत्रात नॉनबीटी (रिफ्युजी) लावणे गरजेचे आहे; परंतु यामुळे उत्पादन घटते म्हणून याकडे दुर्लक्ष झाल्याने कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढळा. त्यानंतर कीडरोगाच्या नियंत्रणासाठी अतिरेकी फवारणी होऊ लागली, असे तज्ज्ञांनी सांगितले. याविषयी जनजागृतीत कृषी विभाग कमी पडल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

निसर्गाने सर्वांना जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार बीटी आल्यानंतर कापसावर जीवनक्रम अवलंबून असलेल्या किडींचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत होता. बीटी कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव कमी व्हावा तसेच किडींना जगण्यासाठी कपाशीची पान, बोंड मिळावी यासाठी बीटी लागवड असलेल्या शेतात नॉनबीटी (रिफ्युजी) काही प्रमाणात लावली जाते. ४५० ग्रॅम बीटीसोबत १२० ग्रॅम नॉनबीटी बियाणे पाकीट दिले जाते. त्याची लागवड करणे सक्‍तीचे आहे; परंतु नॉनबीटी बियाणे लावल्यामुळे तितके उत्पादन कमी होईल, म्हणून शेतकरी रिफ्युजी लावत नाही.

या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ७० हजार हेक्‍टरपैकी एक हेक्‍टरवरदेखील नॉनबीटी लावले गेले नाही. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्‍ती वाढली आणि परिणामी नुकसानीची पातळीदेखील. यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून अनावश्‍यक आणि शिफारसीत मात्रेपेक्षा अधिक कीडनाशकाची फवारणी झाली आणि अनेकांचे बळी गेले.

कृषी विभागाला जनजागृतीत अपयश
नॉनबीटी बियाण्याचे पाकीट बीटी बियाण्यासोबत दिले जाते; परंतु शेतकरी नुकसान होते म्हणून नॉनबीटी बियाणे लावत नाही. याविषयी कृषी विभागाने जागृती करणे गरजेचे होते; परंतु हंगामाच्या सुरवातीला कृषी अधिकारी फिरकतच नाहीत. चार-दोन ओळखीच्या लोकांपर्यंतच पोचतात आणि तेथेच फोटो काढून जागृती केल्याच्या बातम्या देतात, असा आरोप वागद (ता. महागाव) येथील शेतकरी मनीष जाधव यांनी केला.
 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...