agriculture news in Marathi, pest attack on crop in krushna basin, Maharashtra | Agrowon

हुमणी, गोगलगायीच्या प्रादुर्भावाने कृष्णा नदीकाठची पिके धोक्यात
श्यामराव गावडे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी मेटॅरायझियम ॲनिसोप्ली, बियुव्हेरिया बॅसियाना आदी जैविक कीटकनाशकांचा वापर शिफारशीप्रमाणे करावा. सुरवातीपासूनच यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे. 
- ए. एन. साळुंखे, माजी शास्त्रज्ञ, व्हीएसआय, पुणे

नवेखेड, जि. सांगली : वाळवा तालुक्यात कृष्णा नदीकाठावरील शेतीत हुमणी आणि गोगलगायीचे संकट आल्याने शेकडो एकरवरील पिके उद्‍ध्वस्त होऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासकीय पातळीवर उपाययोजना करण्याची शेतकरी करत आहेत.
 

मागील पंधरवड्यात या भागात सलग पाऊस झाला. खरीप पिकांना हा पाऊस मानवणारा होता. आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी भांगलणीच्या (निंदणी) कामांत गुंतला आहे. खरीप पिकांचे रोप, वेल सुकलेले नजरेस पडत असल्याने शेतकऱ्यांनी पिकाच्या बुडतील माती खोदली असता हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. ही हुमणी सध्या हाताच्या अंगठ्याएवढी झाली आहे.

लहान लावणं, वरंब्यावरील भुईमूग, आडसाली ऊस खोडवा या पिकांना हुमणीने लक्ष्य केले आहे. हुमणीच्या या हल्ल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आपापल्या परीने प्रतिबंधात्मक उपाययोउजना करीत आहे. शासकीय पातळीवर मात्र याबाबत उदासीनता आहे. कृषी विभागाने याकडे डोळेझाक केली आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

हे कमी की काय म्हणून गोगलगायीचा हल्लाही खरीप पिकांवर झाला आहे. पिकांची कोवळी पाने व मुळ्या कुरतडल्या जात आहेत. यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हुमणीचा हल्ला होताना पिकाच्या मुळ्या कुरतडल्या जातात. उन्हाळ्यात सुप्तावस्तेत असलेली हुमणीची वाढ सध्या मोठी झाली आहे.

फारणेवाडी बोरगाव येथील संदीप फारणे म्हणाले, की आमचे दोन एकर आडसाली उसाचे क्षेत्र हुमणीने बाधित झाले आहे. ऊस वाळला असून, भुईमुगाचे वेल सुकू लागले आहेत. नवेखेड येथील दीपक गावडे म्हणाले, की ३० गुंठे क्षेत्रांवर गलांडा फुलांची लागवड मागील आठवड्यात केली होती. ५० टक्के क्षेत्रावरील रोपे गोगल गतीने खाऊन टाकली आहेत. आम्ही गोगलगायीचे नियंत्रण करणारे रसायन वापरून हा हल्ला आटोक्यात आणला आहे. तरीही बाधित क्षेत्रामुळे मोठे नुकसान झाले आहे.

इतर अॅग्रो विशेष
गहू पिकाचे जनुकीय विश्लेषण, सुसंगत...आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने गहू पिकाचे...
वऱ्हाडात पावसाचे जोरदार पुनरागमनअकोला  : दोन दिवस उसंत घेतल्यानंतर वऱ्हाडात...
खान्‍देशात जोरदार पाऊसजळगाव : खानदेशात मागील २४ तासांत अनेक ठिकाणी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने...
शासनाच्या नव्या निर्णयाचा महाबीज,...अकोला ः महाबीज आणि राष्ट्रीय बीज निगम यांच्या...
बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम...मुंबई: राज्याला बियाणे उत्पादनात स्वयंपूर्ण...
राज्यातील धरणांमध्ये ५९ टक्के पाणीसाठापुणे : सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह, मध्य...
बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत बांधणी...मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या...
‘ग्लायफोसेट’ला पर्याय काय? पुणे ः ग्लायफोसेट मानवी आरोग्य व पर्यावरणाला...
सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ....मुंबई : राज्यातील शेतीक्षेत्रात रासायनिक खतांचा...
ग्लॅडिअोलस, गुलछडीतून दरवळला यशाचा सुगंधतांत्रिक शिक्षणाचा पुरेपुर वापर, नावीन्यांचा शोध...
‘बकरी ईद’चे उद्दिष्ट ठेवून बोकड संगोपन...बकरी ईदच्या सणाचे उद्दिष्ट ठेवत पुणे जिल्ह्यातील...
विदर्भात दणका; मराठवाड्यात जोरदारपुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने...
तेलंगणातही आढळली लष्करी अळी हैदराबाद ः लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने भारतासह...
केरळला २६०० कोटींचे पॅकेज द्या :...तिरुअनंतपूरम ः पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात...
केळी उत्पादकांना विमा परतावा सात...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत जळगाव...
...तर दूध उत्पादकांना २५ रुपये दर देणे...पुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर...
गुणवत्तेच्या नावाखाली दूधदर कपातीचा...मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी...
काळी आई आणि तिच्या लेकरांवर प्रेम करा४ ऑगस्टच्या ‘अॅग्रोवन’मध्ये तीस वर्षे सतत फ्लॉवर...
युरियाचा वापर हवा नियंत्रितचपंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर राज्यात पावसाने दमदार...