agriculture news in Marathi, Pest attack on tur crop in Vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भात तुरीवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

इक्रिसॅटचे तूर वाण प्रायोगिक तत्त्वावर लावले आहे. परंतु या वेळी ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीदेखील त्यांच्या तूर वाणावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगितले.
- माणिक कदम, शेतकरी, दोनोडा, ता. कळंब, जि. यवतमाळ.

नागपूर ः ढगाळ वातावरणामुळे विदर्भात तुरीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. कपाशीवरील कीड-रोगामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला असताना, त्यांच्यासमोर हे नवे आव्हान उभे राहिले आहे.

कपाशीवर या वर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. अनेक प्रयत्न करूनही या किडीचे नियंत्रण शक्‍य झाले नाही. त्यामुळे विदर्भात सर्वदूर कपाशी काढून टाकण्यावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. कपाशीच्या पिकापासून फटका बसला असतानाच आता ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती वर्तविली जात आहे.

ओखी वादळाच्या परिणामी विदर्भात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. कीड-रोगाला अशा प्रकारचे वातावरण पोषक असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, दाणे शेंगमाशी अशा प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव विदर्भात झाला आहे. त्यामध्ये अकोला, अमरावती, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांतील तुरीचा समावेश आहे.

प्रतिक्रिया
शेंगमाशीचा प्रादुर्भावदेखील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दिसून आला आहे. शेंगा भरलेल्या अवस्थेत याचा प्रादुर्भाव होतो. यामुळे दाणा सडणे किंवा त्याचा आकार कमी होणे अशी अवस्था दिसून येते. त्यासोबतच शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग यांचाही प्रादुर्भाव दिसून आला आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी फवारणीचा निर्णय निरीक्षणाअंती घेणे योग्य आहे.
- धनराज उंदीरवाडे, कीटकशास्त्र विभागप्रमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

इतर बातम्या
कष्टाचे पैसे ना बे?... बुडवणा-यांचं...येवला, जि. नाशिक : तुमचे कष्टाचे पैसे ना बे...
साखर उद्योगासाठी तातडीने प्रयत्न करा :...नवी दिल्ली : अडचणीतल्या साखर उद्योगाला तातडीने...
आदेश पोचले, खरेदी ठप्पच !औरंगाबाद : तूर खरेदीसाठीच्या मुदतवाढीचे आदेश अखेर...
जालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबलीजालना : येथील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष...
सोलापूर दूध संघाला सहा कोटींचा तोटासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभावनवी दिल्ली ः कच्च्या जूटच्या हमीभाव वाढीला...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो...कऱ्हाड, जि. सातारा  ः रखरखत्या उन्हात राबून...
कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील...पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
पाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख...औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
ग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९...अकोला : सद्यःस्थितीत हवामान बदलामुळे शेतीवर...
यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा...वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी...
सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा... सातारा : जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण...
पुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख...पुणे  ः खरीप हंगामासाठी विभागीय कृषी...
हिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात... हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी... नाशिक  : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार...
अकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’ नगर  ः ‘टोमॅटोचे भरघोस उत्पादन आले, सारं...
राज्यात ११ ठिकाणी पारा ४२ अंशांवरपुणे : विदर्भ उन्हात होरपळत असतानाच मध्य...
जळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे... जळगाव  ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत...
रब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ...मुंबई : राज्य सरकारने रब्बी २०१७ -१८ च्या...