agriculture news in marathi, pest on grapes garden, pune, maharashtra | Agrowon

जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर तुडतुडे, थ्रीप्सचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष बागांमध्ये घडनिर्मिती समाधानकारक झाली आहे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने द्राक्ष बागायतदारांना पाणीटंचाईबरोबरच कोवळ्या पानातील रसशोषण करणारे तुडतुडे व थ्रीप्स (फुलकिडी) या किडींचा सामना करावा लागत आहे. काळ्या रंगाच्या जंबो द्राक्षाच्या तुलनेत पांढऱ्या जातीच्या द्राक्ष वेलीवर घड जिरण्याचे प्रमाण जास्त आहे.

नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष बागांमध्ये घडनिर्मिती समाधानकारक झाली आहे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने द्राक्ष बागायतदारांना पाणीटंचाईबरोबरच कोवळ्या पानातील रसशोषण करणारे तुडतुडे व थ्रीप्स (फुलकिडी) या किडींचा सामना करावा लागत आहे. काळ्या रंगाच्या जंबो द्राक्षाच्या तुलनेत पांढऱ्या जातीच्या द्राक्ष वेलीवर घड जिरण्याचे प्रमाण जास्त आहे.

जुन्नर तालुका जंबो जातीच्या निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे. कांदा व इतर भाजीपाल्याला मागील दोन वर्षांपासून योग्य भाव मिळत नसल्याने तालुक्‍यातील प्रामुख्याने पदवीधर युवक द्राक्षशेतीकडे वळले आहेत. जिल्हा बॅंकेकडून अल्पमुदतीचे तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळत असल्याने द्राक्ष उत्पादकांना मोठा आधार मिळाला आहे. येडगाव व नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीने शेतकऱ्यांना सुमारे तीस कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. तालुक्‍यातील सुमारे चार हजार एकर क्षेत्र द्राक्ष बाग लागवडीखाली आहे. यापैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रात जंबो, शरद सिडलेस या काळ्या रंगाच्या द्राक्ष बागा आहेत.

या वर्षी पाऊस लांबल्याने सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आगाऊ द्राक्ष छाटणीचे प्रमाण कमी असून, साठ टक्के द्राक्ष बागांची छाटणी ऑक्‍टोबर महिन्यात करण्यात आली आहे. छाटणीचे नियोजन पाहता या वर्षी द्राक्षाचा तोडणी हंगाम फेब्रुवारी ते मार्चअखेर सुरू राहील. या वर्षी प्रतिकूल हवामान, पावसाची अनिश्‍चितता आदी कारणांमुळे द्राक्षावर तुडतुडे व फुलकिडे या रसशोषक किडींच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले आहे. त्या कोवळ्या वेलीवर हल्ला चढवतात. पानातील रस शोषण केल्याने प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. यामुळे घडाच्या पोषणावर परिणाम होतो.

या भागात बिबट्यांची संख्या जास्त असली तरी जीव धोक्‍यात घालून बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीची फवारणी करावी लागत आहे. निर्यातक्षम द्राक्षात कीटकनाशकाचा अंश राहू नये यासाठी फवारणीवरसुद्धा मर्यादा येत आहेत. कीडनियंत्रणासाठी फवारणीबरोबरच पिवळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर केला जात आहे.  मागील वर्षी एप्रिल महिन्यात उशिरा खरडछाटणी झालेल्या द्राक्ष बागांना पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने कमकुवत व लहान आकाराच्या घडांची निर्मिती झाली आहे. प्रतिकूल हवामानामुळे गळकुजचे प्रमाण वाढले आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...