यवतमाळ मृत्यूकांडामागे तंबाखू असल्याचा जावईशोध

यवतमाळ मृत्यूकांडामागे तंबाखू असल्याचा जावईशोध
यवतमाळ मृत्यूकांडामागे तंबाखू असल्याचा जावईशोध

नागपूर  ः जगात सर्वात जास्त तंबाखू खाणारे नागपूर विभागात आहेत. शेतीकामात राबवणारे ९० टक्‍के मजूर तंबाखू खातात. कीटकनाशक आणि तंबाखू एकमेकांच्या संपर्कात आल्यास त्याचे घातक परिणाम होतात, असा धक्‍कादायक खुलासा करीत तंबाखू आणि खर्रा यावर बंदीची मागणी कीटकनाशक कंपनीच्या प्रतिनिधीने केली.  विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात २४ ऑक्‍टोंबर रोजी विषबाधाप्रकरणी तज्ज्ञ समितीची सभा झाली. त्यात त्यांनी कीटकनाशक कंपन्यांनी बाजू मांडली. या बैठकीचे इतिवृत्त नुकतेच समोर आले. त्यात हा धक्‍कादायक खुलासा झाला आहे.  प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक प्रज्ञा गोळघाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कृषी विकास अधिकारी पी. डी. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक, कृषी विद्यापीठाचे किटकशास्त्र विभागाचे तज्ज्ञ राम गावंडे यांच्यासह समितीमधील दहा सदस्यांचा समावेश होता. यावेळी कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधीची उपस्थिती होती.  विषबाधित रुग्णांवर प्रोटोकॉलनुसार उपचाराची तजवीज करण्यात आल्याचे या वेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती या वेळी दिली. कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनीदेखील या बैठकीत मत मांडले. बैठकीच्या शेवटी कंपनी प्रतिनिधीने भूमिका मांडली. कीटकनाशक आणि खत एकत्रित करून फवारण्याची कोठेच शिफारस नाही, परंतु काही शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत खते आणि कीटनाशक एकत्रित करून फवारतात. त्याच्याही परिणामी धोका संभवतो, असे कंपन्यांच्या प्रतिनिधीने सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com