विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदत

विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदत
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदत

अकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत पावलेल्या राज्यातील ६३ शेतकरी व शेतकरी मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत सरकारने मंजूर केली अाहे. यापूर्वी आठ कुटुंबांना मदतीची रक्कम देण्यात आली असून, उर्वरित ५५ कुटुंबीयांसाठी १.७० कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. मदतीची रक्कम तत्काळ संबधित कुटुंबांना वितरित करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत.  गतवर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकांवर कीटकनाशके फवारताना शेकडो शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होऊन, ६३ शेतकरी व शेतकरी मजुरांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश २२ फेब्रुवारी २०१८ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. मात्र त्यांचेपैकी यवतमाळ येथील मृत १२ शेतकरी व ९ शेतमजुरांपैकी केवळ आठ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाच प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून विमा कंपन्यांकडून देण्यात आली. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व मृत शेतकरी व शेतकरी मजुरांच्या कुटुंबीयांना समान चार लाख रुपये मदत देणे अपेक्षित होते. त्यानुसार २६ शेतकरी व २९ शेतमजूर अशा एकूण ५५ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तत्काळ देण्यासाठी १.७० कोटी रुपये आकस्मिकता निधीतून वितरित करण्यास १५ मे रोजी शासन मंजुरी देण्यात आली आहे. 

या निधीतून मिळेल मदतीची रक्कम  मंजूर मदतीची रक्कम मुख्यमंत्री साह्यता निधी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना व आकस्मिक निधीतून वितरित करण्यात येणार असून, त्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.  सर्वाधिक बळी यवतमाळ, अकोला दुसऱ्या क्रमांकावर  कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने, सर्वाधिक बळी २१ बळी यवतमाळ जिल्ह्यात गेले असून, दुसऱ्या क्रमांकावर अकोल्यात बळींची संख्या नऊ आहे. त्यानंतर नागपूर सात, चंद्रपूर चार, भंडारा तीन, गडचिरोली तीन, नांदेड चार, जळगाव दोन, सोलापूर दोन, अमरावती दोन, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com