agriculture news in marathi, pesticide poisoning deaths are hidden by health department, nagpur, maharashtra | Agrowon

कीटकनाशक विषबाधितांचे मृत्यू आरोग्ययंत्रणेने दडवले?
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

आमच्याकडून नियमित अहवालाद्वारे माहिती दिली जात आहे. या संदर्भाने होणारे आरोप तथ्यहीन आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार दर्जाचा अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्‍त केला आहे. त्यांना दररोज माहिती पुरवली जाते. फवारणीदरम्यान विषबाधितांवर उपचारासाठी आमच्याकडे आधुनिक यंत्रणा कार्यान्वित आहे. कृत्रिम श्‍वासोच्छवास यंत्रणादेखील पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला.

नागपूर   ः अकोला जिल्ह्यात पिकावर कीटकनाशकाच्या फवारणी दरम्यान विषबाधा झालेल्या चौघांच्या मृत्यूविषयी आरोग्य यंत्रणेने प्रशासनाला कळवलेच नाही, अशी धक्कादायक माहिती कृषी विभागातील सूत्राने दिली. गेल्या वर्षी यवतमाळ येथे झालेल्या विषबाधा प्रकरणानंतर अशा मृत्यूंविषयी आरोग्य यंत्रणेने प्रशासनाला तात्काळ माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही अकोल्यात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळत दैनंदिन अहवाल दिला जात असल्याचे स्प्ष्ट केले आहे.

अकोला जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांचा पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू झाला. त्यात राजू नामदेव राऊत (गायगाव), गजानन किसन बकाल (सुकोडा) यांच्यासह  दहिगाव (ता. तेल्हारा) येथील एक शेतकरी तसेच अकोट तालुक्‍यातील एक आदिवासी शेतकरी यांचा समावेश आहे. यासंदर्भात आरोग्य यंत्रणेकडून माहिती मिळाली नाही; तर वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांमुळे या घटना समजल्या, असे कृषी विभागातील सूत्राने सांगितले.

वृत्तपत्रांतील बातम्यांनंतर कृषी विभागाने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून माहिती घेण्याचे प्रयत्न केले. त्यावर १४ ऑगस्टच्या अहवालात फवारणी दरम्यान विषबाधितांपैकी एकाचाही मृत्यू नसल्याचे कळविण्यात आले. त्यानंतर २० ऑगस्टच्या अहवालात मात्र चौघांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली, असे कृषी विभागाच्या सूत्राने सांगितले.

गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात कापसावरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी करताना ४५० हून अधिक व्यक्तींना विषबाधा झाली. त्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. राज्यभरात फवारणीदरम्यान विषबाधेमुळे बळींचा आकडा ४९ वर गेला. राज्य सरकारने त्याची दखल घेत यंदाच्या हंगामात फवारणी दरम्यान विषबाधा होऊन रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची स्वतंत्र नोंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, गेल्या वर्षीचा अनुभव आणि शासनाचे आदेश असूनही आरोग्य विभागाची यंत्रणा मात्र यासंदर्भात गंभीर नसल्याचेच उघड होत आहे.

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...