agriculture news in Marathi, pesticide poisoning report is necessary, Pune | Agrowon

कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारक
मनोज कापडे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

पुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा वापर करताना विषबाधा झाल्यास त्याचा अहवाल राज्याच्या मुख्य पीक संरक्षक अधिकाऱ्याला पाठविण्याचे कायद्याने बंधन घालण्यात आले आहे. मात्र कायद्यात तरतूद असूनही अहवाल पाठविले जात नसल्यामुळे राज्य शासनाने नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारक असून, अहवाल न पाठविल्यास कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

पुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा वापर करताना विषबाधा झाल्यास त्याचा अहवाल राज्याच्या मुख्य पीक संरक्षक अधिकाऱ्याला पाठविण्याचे कायद्याने बंधन घालण्यात आले आहे. मात्र कायद्यात तरतूद असूनही अहवाल पाठविले जात नसल्यामुळे राज्य शासनाने नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारक असून, अहवाल न पाठविल्यास कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

कीटकनाशकांची हाताळणी व वापर करताना विषबाधा झाल्यास अशा प्रकरणात अहवाल सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्याचा अधिकार केंद्र शासनाने राज्य शासनाला दिला होता. त्यासाठी राज्य शासनाने १९८० मध्येच अधिसूचनादेखील काढली होती. मात्र विषबाधा झाल्यानंतर कोणीही अहवाल पाठवत नसल्याचे ‘अॅग्रोवन’ने उघड केले होते. 

‘‘यवतमाळच्या विषबाधा प्रकरणात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता ही बाब शासनाने गांभीर्याने घेतली आहे. राज्यातील सर्व प्राधिकृत अधिकाऱ्यांना आता मुख्य पीक संरक्षक अधिकाऱ्याला अहवाल पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे अहवाल यापूर्वीपासून आले असते, तर वेळीच उपाययोजना करून अनेक शेतकरी व शेतमजुरांचे प्राण वाचविणे शक्य झाले असते. त्यामुळे अहवाल न पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईदेखील होऊ शकते,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कीटकनाशकामुळे विषबाधा होताच कायद्यातील तरतुदीनुसार अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, हिवताप निर्मूलन अधिकारी, सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी, वनाधिकारी, पशुशल्य चिकित्सक, जिल्हा परिषदाचे गटविकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. 

यापुढे आता विषबाधा झाल्यास सर्व तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकाऱ्यांनादेखील अहवाल पाठवावा लागणार आहे. राज्यातील कोणत्याही खासगी रुग्णालयात, दवाखान्यात अथवा नर्सिंग होममध्ये कीटकनाशकामुळे विषबाधा झालेला रुग्ण आल्यास दडवून ठेवता येणार नाही. ही माहिती राज्याच्या मुख्य पीक संरक्षक अधिकाऱ्याला कळवावीच लागेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

जबाबदारी अजूनही शेतकऱ्यावरच
राज्य शासनाने कीटकनाशकांच्या वापराबाबत अंतिम जबाबदारी अजूनही शेतकऱ्यावरच ठेवली आहे. ‘‘कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुराने प्रतिबंधात्मक कीटचा वापर केला पाहिजे. शेतमजुराकडून फवारणी करून घेणाऱ्या शेतकऱ्याने हे कीट पुरविले पाहिजे. शेतकऱ्याने यापुढे विषबाधेचा प्रकार घडल्यास माणुसकी व सामाजिक भान ठेवत कृषी सहायक आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याला तसेच तहसीलदार व पोलिसालादेखील मोबाईलद्वारे माहिती कळवावी. बाधित झालेल्या कुटुंबाच्या सदस्यांनादेखील शेतकऱ्याने माहिती द्यावी,’’ असे शासनाने म्हटले आहे. 

अप्रमाणित नमुने आढळताच कारवाई करा
कीटकनाशकांचे नमुने अप्रमाणित आढळल्यानंतरही कृषी खात्याचे अधिकारी संबंधित कंपन्यांवर कारवाई करीत नाहीत. साटेलोटे असल्यामुळे अशी प्रकरणे दाबली जातात. त्यामुळे कारवाई न होण्याच्या प्रकरणांवर आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याने स्वतः देखरेख ठेवावी, असे आदेश मंत्रालयातून देण्यात आले आहेत. यातील दोषी कोण आहेत ते शोधून त्यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवावेत, असेही आदेश देण्यात आलेले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...
त्रिगुणी म्हशीची विजयी पताकाजगात सर्वप्रथम हॅंड गाईडेड क्लोनिंग म्हणजे हस्त...
जाणिवेचा लॉंग मार्चशेतकरी संपामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा...
विदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसायकडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भामध्ये...
तुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणारपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र,...
कृषी योजनांचा निधी खर्च करण्यात अपयशपुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी...
शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काहीच वाटत...राळेगणसिद्धी, जि. नगर : ‘‘लोकपाल आणि लोकायुक्त...
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंडगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार...
‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...