पीक वाचविण्याच्या संघर्षात ११ जणांनी गमावला जीव
विनोद इंगोले
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

यवतमाळ ः पीक वाचविण्याच्या संघर्षात फवारणी केल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ११ शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला. याच संघर्षात तब्बल ५६० पेक्षा अधिक व्यक्‍तींना विषबाधा झाली असून, या सर्वांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

यवतमाळ ः पीक वाचविण्याच्या संघर्षात फवारणी केल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ११ शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला. याच संघर्षात तब्बल ५६० पेक्षा अधिक व्यक्‍तींना विषबाधा झाली असून, या सर्वांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र नऊ लाख हेक्‍टर आहे. त्यापैकी ५० टक्‍के म्हणजे साडेचार लाख हेक्‍टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. यावर्षी कपाशीवर सुरवातीला मावा, तुडतुडे, गुलाबी बोंडअळी व आता मिलीबगचा प्रादुर्भाव झाला आहे. एैन भरात आलेले हे पीक कीडरोगांमुळे हातचे जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांकडून हे पीक वाचविण्यासाठी सारे प्रयत्न अवलंबिले जात आहे.

त्याकरिता कपाशीवर सातत्याने फवारणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. जिल्ह्यात बीटी कपाशीची लागवड सर्वाधिक आहे. त्यातच शेतकऱ्यांनी शिफारसीत अंतराऐवजी सघन लागवड पद्धतीचा अंगीकार केला आहे. त्यामुळे कपाशीची झाड दाट झाली असून त्यांची वाढदेखील सहा फुटांपेक्षा अधिक आहे.

तांत्रिक ज्ञान नाही
कपाशीचे कीड नियंत्रण मजुरांमार्फत केले जाते. त्याकरिता मजुरांच्या टोळ्या जिल्ह्यात आहेत. मजुरांना फवारणीचे तांत्रिक ज्ञान नाही. त्यातच मजुरांच्या उंचीपेक्षा कापसाच्या झाडांची उंची अधिक झाल्याने त्यावर फवारणी करताना तो अंश थेट तोंडात जातो. त्यामुळे सुमारे ११ मजुरांना महिनाभरात जीव गमवावा लागला. सात जणांमध्ये दृष्टिदोष निर्माण झाला आहे. त्यामध्ये हरबा भीमा टेकाम, काशिनाथ टेकाम, महेश पाचभाई, विलास राठोड, मारोती तुमराम, गजानन चाफले यांचा समावेश आहे.

सर्वाधिक बाधित तालुके
तालुक्‍यात विषबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ आर्णी, वणी, पांढरकवडा, पुसद, महागाव या तालुक्‍यातील रुग्ण आहेत. बाधितांची संख्या ५६० पेक्षा अधिक असल्याने प्रशासनात हाहाकार उडाला आहे. शासकीस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी (ता.२८) उपचार सुरू असलेले १४६ रुग्ण होते.

मोठ्या संख्येने विषबाधित रुग्ण दाखल होत असल्याने रुग्णालयात जागा नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांवर जमिनीवरच उपचार केले जात आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अमरावती जिल्ह्यातील धामनगावचेदेखील काही रुग्ण दाखल झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातदेखील फवारणी करताना विषबाधा झालेले रुग्ण आढळले असून त्यांच्यावरदेखील यवतमाळमध्ये उपचार सुरू आहेत.

मदतीची मागणी
शेतमजुरांचे कुटूंब त्याच्या जाण्यामुळे रस्त्यावर येत असल्याने त्यांना पाच लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासोबतच शेतकरी, शेतमजुरांना फवारणीची शास्त्रोक्‍त माहिती पोचविण्यात कुचराई करणाऱ्यांवर कारवाईची मागणीदेखील त्यांनी केली. कृषी विद्यापीठ, कृषी विभागाचे दुर्लक्ष या घटनांमागे असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...