अकोल्यात चौदा कोटींचा कीटकनाशकांचा साठा जप्त
गोपाल हागे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कृषी विभाग अाणि पुणे येथून अालेल्या तज्ज्ञांच्या चमूने गेले तीन दिवस अकोल्यातील विविध कीडनाशक विक्रेत्यांचे सर्व गोदाम छाणून काढले. या चौकशीदरम्यान प्रंचड प्रमाणात घोळ समोर अाले अाहेत.

अकोला ः जिल्हा कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी यंत्रणा अाणि पुणे येथून अालेल्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत अकोला येथील विविध कंपन्यांचा सुमारे १४ कोटी ३१ लाख रुपयांचा साठा जप्त करुन विक्रीबंदचे आदेश दिले. अातापर्यंतच्या कारवाईत विविध कीडनाशक उत्पादक कंपन्यांचा मिळून २८४.३१ मेट्रिक टन साठा असल्याची माहिती पुढे अाली अाहे. 

कीडनाशकांची एक मोठी बाजारपेठ असलेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात बनावट कीडनाशकांचा गोरखधंदा होत असल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने दिले होते. यामुळे राज्य स्तरावरील यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कृषी विभाग अाणि पुणे येथून अालेल्या तज्ज्ञांच्या चमूने गेले तीन दिवस अकोल्यातील विविध कीडनाशक विक्रेत्यांचे सर्व गोदाम छाणून काढले. या चौकशीदरम्यान प्रंचड प्रमाणात घोळ समोर अाले अाहेत.

कीटकनाशकांच्या तपासणीमध्ये अक्षम्य प्रकारच्या त्रुटी अाढळून अाल्याने थेट विक्रीवर बंदी घालण्यात अाली. यात प्रामुख्याने जीवितास हानीकारक, परवान्यात समाविष्ट नसलेल्या औषधांचा साठा, उगम प्रमाणपत्रात नाव नसणे, साठा रजिस्टर अद्ययावत नसणे, कर्मचारी प्रशिक्षित नसणे, बिगर नोंदणीकृत कीटकनाशकांची विक्री, खत नियंत्रण अादेशाचे उल्लंघन अशी कारणे समोर अाली अाहेत. तपासणी मोहीम सुरू असल्याने या अाकडेवारीमध्ये अाणखी वाढ होण्याची शक्यता अाहे.   

विक्रेता व गोदाम नाव
पारिजात इंडस्ट्रीज लिमिटेड, कृषी रसायन एक्स्पोर्ट, क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रा. लि. अाझादपूर दिल्ली, घरडा केमिकल्स लि. सांबा (जम्मू व काश्मीर),  मे. फायटोकेम इंडिया लि, मेडक अांध्र प्रदेश, मे. जयलक्ष्मी इंडस्ट्रीज गुजरात, सिंजेटा इंडिया लि, एफएमसी इंडिया प्रा. लि, शिवालीक क्रॉपसायन्सेस, सल्फर मिल्स लि, बायोस्टँड.

इतर ताज्या घडामोडी
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...