agriculture news in Marathi, pesticide void profitable farming is possible, Maharashtra | Agrowon

रसायन विरहित फायद्याची शेती शक्य
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जानेवारी 2018

शेतीचे प्रश्‍न मांडताना ॲग्रोवनने शेतकऱ्यांच्या मूळ समस्येला हात घातला, जमीन चांगली तर पिके चांगली, पिके चांगली तर शेतकरी आनंदी, सकस अन्न, असा सगळा हा चांगला परिणाम करणारा विषय ॲग्रोवनने हाती घेतला, त्याचा व्यापक स्वुरूपाचा चांगला परिणाम होणार आहे.इतर शेतकऱ्यांनीही ॲग्रोवनच्या या मोहिमेत, अभियानात सहभागी व्हावे.
- विश्‍वासराव पाटील, प्रगतिशील शेतकरी, जळगाव

भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती दुर्लक्षित आहे, हे पदोपदी जाणवते. शेतीचे सेंद्रिय कर्ब कमी झाले. त्याला कारण म्हणजे पिकांची फेरपालट न करणे, एकच पीक घेणे, फक्त पैसे देईल तेच पीक घेणे (उदा, कपाशी, केळी व इतर). शेतकरी कधी मिश्र पिके, सापळा पिके, नैसर्गिक कीड नियंत्रण याकडे मोठ्या संख्येने वळलेच नाहीत. काही मोजके शेतकरी आपापल्या परीने हे प्रयत्न करून आपली शेती समृद्ध करताना दिसून येतात. जमीन सुपीकता हा विषय विद्यापीठे, शासन, कृषी विभाग या सर्वांनी दुर्लक्षित केला, असे मत जळगाव जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी विश्‍वासराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

मी ज्या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी शिक्षण विस्तार परिषदेत शेतकरी सदस्य होतो, त्या वेळी मी अनेकदा नैसर्गिक शेतीचे मुद्दे मांडले, त्यासाठी काय करावे, याचे आराखडे सांगितले. परंतु हा विषय तसा दुर्लक्षित राहीला. कोरडवाहू शेती, नैसर्गिक शेती यासाठी तत्कालीन सरकार, कृषी विद्यापीठाने संकल्पना प्रत्यक्षात याव्यात, यासाठी ठोस असे काम केले नाही.

मी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या एनकॅप समितीवर असताना नैसर्गिक शेतीची संकल्पना मांडली होती. परंतु, शासनाने अशी ठोस तरतूद केली नाही. अलीकडे हा विषय चर्चेत आला आहे. त्यासाठी राज्याच्या कृषी विद्यापीठांमध्ये कार्यवाही सुरू झाली आहे. काम सुरू झाले, हे ठीक आहे. परंतु शेतकऱ्याच्या बांधावर ते पोचले पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीसंबंधी माहिती नाही.

आपली शेती समृद्ध करण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढविणाऱ्या उडीद, मूग या पिकांमध्ये शेतकऱ्यांनी रस घेतला पाहीजे. मिश्र, सापळा पिके घेतली पाहीजेत. शेतात जे तण उगते, तुरखाटी, पऱ्हाटी, केळीचे अवशेष हे न जाळता त्याचा शेतासाठीच उपयोग करावा. पाचट, कोरड्या पानांचे पिकांमध्ये आच्छादन करावे. मी २० वर्षे शेतात एक कणही रासायनिक घटक वापरले नाहीत. पण नैसर्गिक शेतीमुळे माझे उत्पादन कमी झाले, असे नाही. चांगले उत्पादन मी घेतो.
- विश्‍वासराव पाटील, प्रगतिशील शेतकरी, जळगाव.

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...