agriculture news in marathi, Pesticide will be given after prescription, Government | Agrowon

कीटकनाशकांसाठीही आता ‘प्रिस्क्रिप्शन’!
सिद्धेश्‍वर डुकरे ः सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

मुंबई ः ज्याप्रमाणे एखादा रोग बरा व्हावा, यासाठी डॉक्‍टर औषधांच्या नावांची चिठ्ठी अर्थात प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, त्याच धर्तीवर कृषी विभागाचे निविष्ठा व पत नियंत्रण अधिकारी पिकांवरील रोगांसाठी फवारणी करण्यासाठी योग्य अशा कीटकनाशकांची चिठ्ठी शेतकऱ्यांना लिहून देतील. यावर कृषी विभागात बैठकांचे सत्र झडत असून, लवकरच याबाबत ठोस अंमलबजावणी होणार आहे. कृषी विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जिवांचा धोका टळणार आहे.

मुंबई ः ज्याप्रमाणे एखादा रोग बरा व्हावा, यासाठी डॉक्‍टर औषधांच्या नावांची चिठ्ठी अर्थात प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, त्याच धर्तीवर कृषी विभागाचे निविष्ठा व पत नियंत्रण अधिकारी पिकांवरील रोगांसाठी फवारणी करण्यासाठी योग्य अशा कीटकनाशकांची चिठ्ठी शेतकऱ्यांना लिहून देतील. यावर कृषी विभागात बैठकांचे सत्र झडत असून, लवकरच याबाबत ठोस अंमलबजावणी होणार आहे. कृषी विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जिवांचा धोका टळणार आहे.

राज्यात विषारी औषध फवारणीत ४३ हून जास्त शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना प्राणास मुकावे लागले आहे. यामुळे पिकांवरील रोगराई आणि औषध फवारणी हे विषय चर्चेचे बनले आहेत. यावर केवळ फवारणी औषधनिर्मिती कंपन्या किंवा विक्रेत्यांवर कारवाई करून हा विषय संपणारा नाही, हे लक्षात आल्याने कृषी विभागाने यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी या विभागातील जाणकारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

ज्याप्रमाणे एखाद्या रोगावर निश्‍चित असे औषध, गोळ्या घेण्यासाठी डॉक्‍टर चिठ्ठी लिहून देतात, त्याचप्रमाणे कृषी विभागाचे निविष्ठा व पतनियंत्रण अधिकारी शेतकऱ्यांना चिठ्ठी लिहून देतील. या चिठ्ठीवर संबंधित अधिकाऱ्याचे नाव, शिक्‍का असेल. शेतकऱ्यांची संख्या, भौगोलिक अंतर व वेळ याचा विचार करून कृषी सहायक, कृषी अधीक्षक, निविष्ठा व पतनियंत्रण अधिकारी ही चिठ्ठी लिहून देणार आहेत. ही चिठ्ठी कृषी औषध विक्रेत्याच्या दुकानात घेऊन गेल्यानंतर त्या चिठ्ठीनुसार शेतकऱ्याला औषधे मिळतील. याबाबत लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. 

शेतकऱ्यांचे प्रबोधन करून अशा प्रकारे योग्य पिकासाठी योग्य फवारणी औषधासाठी कृषी विभागाकडून अधिकृत ‘प्रिस्क्रिप्शन’ दिले जाणार आहे. यामुळे शेतकरी बळी जाणार नाहीत. तसेच शेतकऱ्यांच्या जिवाला काही धोका झाला, तर कोणाला जबाबदार धरायचे याबाबत संदिग्धता राहणार नाही.

इतर अॅग्रो विशेष
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...
कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...
पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...
‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...