agriculture news in marathi, pesticides supply disrupts from m.a.i.d.c., pune, maharashtra | Agrowon

कीडनाशकांचा पुरवठा ‘कृषी उद्योग’कडून विस्कळित
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे : राज्यातील शेकडो गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांवर कीड-रोगांचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असताना महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाकडून कीडनाशकांचा (पेस्टिसाइड्‌स) पुरवठा विस्कळित झालेला आहे. यामुळे कीड-रोग नियंत्रणात अडथळे येत असल्याने कृषी विभाग हैराण झाला आहे.

पुणे : राज्यातील शेकडो गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांवर कीड-रोगांचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असताना महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाकडून कीडनाशकांचा (पेस्टिसाइड्‌स) पुरवठा विस्कळित झालेला आहे. यामुळे कीड-रोग नियंत्रणात अडथळे येत असल्याने कृषी विभाग हैराण झाला आहे.

शेतकऱ्यांना क्विनॉलफॉस, प्रोफेनोफॉस, क्लोरपायरिफॉस, कार्बेन्डाझिम, इंडोक्झाकार्ब, अॅसिटामिप्रिड या कीटकनाशकांचा पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाकडून ‘कृषी उद्योग’ला पत्र दिले गेले आहे. मात्र सतत घोटाळ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या कृषी उद्योग महामंडळाची शेतकऱ्यांसाठी काम करण्याची वेळ येताच पिछाडीवर जाण्याची असलेली प्रतिमा यंदाही कायम आहे.

राज्यात सध्या ९०० पेक्षा जास्त गावांमध्ये पिकांवर मावा, तुडतुडे, फुलकिडी यांसारख्या रसशोषक किडींचा फैलाव झालेला आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना केवळ सल्लाच नव्हे, तर काही प्रमाणात रासायनिक किडनाशकांचा पुरवठा करण्याची जबाबदारी कृषी विभागावर आहे. मात्र, कृषी विभागाला स्वतः  किडनाशकांची खरेदी न करता ‘कृषी उद्योग’ची मदत घ्यावी लागते. कृषी विभागाला एक लाख दहा हजार लिटर्स  किडनाशकांची तातडीने आवश्यकता असताना ऑगस्टच्या पंधरवड्यापर्यंत ७९ हजार लिटर्स  किडनाशके ‘कृषी उद्योग’ने पुरवली नाहीत.

कपाशीतील बोंड अळीचे संकट आता ७०० गावांच्या पुढे पसरले आहे. एका बाजूला गावांमध्ये अजूनही शेतकऱ्यांना अनावश्यकपणे संजीवकांचा वापर करण्यास भाग पाडले जात आहे. पण, दुसऱ्या बाजूला अत्यावश्यक कीडनाशके पुरवण्यात आम्हीदेखील कमी पडत आहोत. त्याला कृषी उद्योग महामंडळ जबाबदार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कृषी विभागाला सर्वांत जास्त चिंता बोंड अळीच्या प्रादुर्भावाची आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  किडनाशकांचा भरपूर प्रमाणात पुरवठा झाला, तरच शेतकऱ्यांना वेळेवर वाटप करून त्याची फवारणी होऊ शकते, अन्यथा बोंड अळीचे संकट वाढत जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे प्रोफेनोफॉस हे कीटकनाशक सध्या कृषी विभागाकडून पुरविले जात नसल्याचे दिसून येते.

कृषी विभागाला ३० हजार लिटर प्रोफेनोफॉसची आवश्यकता असताना दहा हजार लिटर इतकाच पुरवठा ‘कृषी उद्योग’ने केला आहे. कापूस व इतर पिकांवरील कीड-रोग नियंत्रणासाठी राज्यात एक लाख लिटरपेक्षा जास्त कीडनाशकांची आवश्यकता होती. त्यानुसार आम्ही कृषी उद्योग विकास महामंडळाला मागणीपत्रदेखील दिले. मात्र, महामंडळाने केवळ ३० हजार लिटरच्या आसपास कीडनाशकांचा पुरवठा केला. प्रॉफेसेनोफॉसबाबत तर पुरवठाच करता येणार नसल्याचे महामंडळाकडून सांगितले गेले आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

कीड व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने यंदा भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. कीड नियंत्रणासाठी आम्हाला १७ कोटी रुपये जादा देण्यात आलेले आहेत. यात बोंड अळी नियंत्रणासाठी आठ कोटी रुपये देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. मात्र, ‘कृषी उद्योग’च्या सुस्त कारभारामुळे निधी आहे, पण  किडनाशके नाहीत अशी अवस्था कृषी विभागाची आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 ‘मागणीप्रमाणेच कीडनाशकांचा पुरवठा’
कीडनाशकांबाबत कृषी विभागाकडून आलेल्या मागणीप्रमाणेच आम्ही पुरवठा करतो आहे. मात्र अचानक मागणी आल्यामुळे काही समस्या तयार झाल्या. तथापि, आम्ही ‘महाराष्ट्र इनसेक्टिसाइड कंपनीच्या संपर्कात असून, मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी महामंडळाकडून काळजी घेतली जात आहे, असे महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...