पेथाई चक्रीवादळ आज धडकणार

पेथाई चक्रीवादळ आज धडकणार
पेथाई चक्रीवादळ आज धडकणार

पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘पेथाई’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत अाहे. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे झेपावणारे चक्रीवादळ आज (ता. १७) आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. पूर्व किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत (ता. १८) पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या तापमानातही चढ-उतार होत असून, जळगाव येथे नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. `पेथाईप’ चक्रीवादळाचे केंद्र चेन्नईपासून पूर्वेकडेकडे ४३० किलोमीटर, आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणमपासून ५६० किलोमीटर दक्षिणेकडे समुद्रात आहे. आज (ता. १७) त्याचे तीव्र चक्रीवादळीत रूपांतर होण्याची शक्यता असून, दुपारनंतर ते मच्छलीपट्टणम आणि काकीनाडाच्या आसपास जमिनीवर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रणालीमुळे पूर्व किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर समुद्र खवळून उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  रविवारी (ता. १६) दुपारनंतर विदर्भ, मराठवाड्यात हवामान ढगाळ झाले हाेते. आज (ता. १७) विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक हवमान, उत्तरेकडून येणारे थंड वारे यामुळे राज्याच्या तापमानातही चढ-उतार होत आहेत. रविवारी सकाळी राज्यात किमान तापमान काहीशी घट झाली होती. जळगाव, नाशिक, नागपूर येथे तापमान १० अंशांपर्यंत खाली उतरले होते. 

रविवारी (ता. १६) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२.५ (१), जळगाव १०.२ (-१), कोल्हापूर १६.९ (१), महाबळेश्‍वर १२.१ (-१), मालेगाव ११.४ (०), नाशिक १०.५ (०), सांगली १५.७ (१), सातारा १५.७ (२), सोलापूर १५.५ (०), सांताक्रूझ २२.८ (४), अलिबाग २२.२ (४), रत्नागिरी २२.८ (२), डहाणू २०.० (२), आैरंगाबाद १२.५ (१), परभणी ११.६ (-२), नांदेड १३.५ (१), अकोला ११.७ (-२), अमरावती १३.० (-२), बुलडाणा ११.४ (-३), चंद्रपूर १७.० (३), गोंदिया १२.० (०), नागपूर १०.५ (-२), वर्धा १३.२ (-१), यवतमाळ ११.० (-१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com