पेट्रोल, डिझेलची सोळावी दरवाढ !

पेट्रोल, डिझेलची सोळावी दरवाढ !
पेट्रोल, डिझेलची सोळावी दरवाढ !

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयात होणारी घसरण, तसेच जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे इंधन दरवाढ आज (सोमवार) सलग सोळाव्या दिवशी पाहायला मिळाली. पेट्रोलच्या दरात 23 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 32 पैशांनी वाढ झाली. पेट्रोल व डिझेल दरात रविवारी अनुक्रमे १२ व १० पैशांची वाढ करण्यात आली होती. आज सलग सोळाव्या दिवशीही वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी आज इंधन दरवाढी विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. 

राजधानी दिल्लीत पेट्रोल व डिझेलचा दर अनुक्रमे 80.73 व 72.93 रुपयांवर गेला आहे. रुपयाने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठल्याने आयात अधिक खर्चिक बनली असून, परिणामी ऑगस्टच्या मध्यापासून पेट्रोल 3.65 रुपये, तर डिझेल 4.14 रुपयांनी महागले आहे. 

उत्पादन शुल्कातून दुप्पट कमाई  केंद्र सरकार : राज्ये  ९९ हजार १८४ : १,३७,१५७  २०१४-१५ : २०१४-१५  -------------------  २,२९,०१९ : १,८४,०९१  २०१७-१८ : २०१७-१८ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com