agriculture news in marathi, petro rate hike onway to 100 rupees | Agrowon

पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना काही दिवसांपासून इंधन दरवाढीचे दाहक चटके सोसावे लागत आहेत. ऑगस्टच्या मध्यापासून सातत्याने इंधन दरवाढीचा पारा चढतच असून, तो रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. रविवारी मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 89.29 रुपये तर एक लिटर डिझेलसाठी 78.26 रुपये मोजावे लागत होते. शंभरीकडे वाटचाल सुरू असलेल्या पेट्रोल दरवाढीचा नागरिकांना दाह सोसेनासा होत आहे. 

मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना काही दिवसांपासून इंधन दरवाढीचे दाहक चटके सोसावे लागत आहेत. ऑगस्टच्या मध्यापासून सातत्याने इंधन दरवाढीचा पारा चढतच असून, तो रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. रविवारी मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 89.29 रुपये तर एक लिटर डिझेलसाठी 78.26 रुपये मोजावे लागत होते. शंभरीकडे वाटचाल सुरू असलेल्या पेट्रोल दरवाढीचा नागरिकांना दाह सोसेनासा होत आहे. 

इंधन दरवाढीमुळे आपसूकच मालवाहतुकीचे भाडेही वाढते. परिणामी भाजीपाला, फळे, धान्य तसेच अन्य जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होत आहे. परिणामी मासिक बजेट कोलमडत असल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

ऑगस्टच्या मध्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण तसेच इंधन दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी सुसंगत केल्याने देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत आहे. ऑगस्टच्या मध्यापासून जवळपास प्रत्येक दिवशी इंधनाचे दर वाढत आहेत. गेल्या आठवड्यात केवळ बुधवारी या वाढीला ब्रेक लागला. त्या दिवशी दरवाढ झाली नव्हती तर वाढीला अल्पसा विराम मिळाला होता. रविवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 28 आणि 19 पैशांनी वाढ झाली. रोज नवा उच्चांक गाठणाऱ्या या दरांमुळे सर्वसामान्यांमध्ये असलेल्या रोषाचा लाभ उठवण्याचा प्रयत्न विरोधक करत असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या वाढीस आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत असल्याचा दावा केला. अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध तसेच अमेरिका आणि तेल उत्पादक देशांमधील वाद त्यात जबाबदार असल्याचे सांगत केंद्र सरकार लवकरच हे दर कमी करण्याबाबत पावले उचलून सर्वसामान्यांना दिलासा देईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

महाराष्ट्रात इंधन महाग 
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. त्यास इंधनावर आकारले जाणारे कर कारणीभूत आहेत. जनतेत असलेल्या रोषाची दखल घेत आंध्र प्रदेश, राज्यस्थान तसेच पश्‍चिम बंगालसारख्या राज्यांनी इंधनावरील कर कमी केले आहेत. राज्यानेही तसे केल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकेल. केंद्रानेही इंधनाचे दर जीएसटीच्या कक्षेत आणल्यास पेट्रोल-डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर कमी होतील, असे जाणकारांचे मत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
गहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...
साताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...
राज्य सहकारी बँकेला  १०० कोटींचे...मुंबई  : राज्य शासनाने राज्य सहकारी...
‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई  : राज्याच्या कृषी खात्याच्या...
शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...
किसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...
कृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे  : येथील अॅग्रिकल्चरल...
गाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...
जळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...
सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
परभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...
'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...
शेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...
भावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...