पेट्रोल, डिझेलचा आगडोंब; दरवाढीची हॅट्ट्रीक

पेट्रोल, डिझेलचा आगडोंब; दरवाढीची हॅट्ट्रीक
पेट्रोल, डिझेलचा आगडोंब; दरवाढीची हॅट्ट्रीक

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारी प्रतिलिटर सुमारे 39 पैशांची वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलचे दर दैनंदिन स्वरूपात बदलू लागल्यानंतर 14 महिन्यांत झालेली ही सर्वांत मोठी दरवाढ ठरली आहे.  पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 39 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 44 पैसे वाढ करण्यात आली. पेट्रोलचा दर दिल्लीत आज प्रतिलिटर 80.38 या उच्चांकी पातळीवर गेला, तर मुंबईत तो 87.77 रुपयांवर गेला. डिझेलचा दर आज दिल्लीत प्रतिलिटर 72.51 आणि मुंबईत 76.98 रुपयांवर गेला. 

देशव्यापी बंदचा इशारा  देशभरात इंधनदरवाढीचा भडका उडाला आहे. विरोधी पक्षांनी सरकारला यावरून लक्ष्य केले आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी 10 सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. 

सरकारकडून दिलासा नाही  इंधन दरवाढीतून सामान्य नागरिकांना दिलासा देणारे पाऊल उचलण्यास सरकारने नकार दर्शविला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतीच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची शक्‍यता फेटाळून लावली होती. 

ऑगस्टच्या मध्यापासून भडका  ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. तेव्हापासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.85 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.3 रुपयांची वाढ झाली आहे. खनिज तेलाचे वाढते भाव आणि रुपयातील घसरण यामुळे इंधन दरवाढ होत आहे. 

दरात अर्ध्यापेक्षा अधिक करच  पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री दरापैकी निम्मी रक्कम ही केंद्र व राज्य सरकारच्या करांची आहे. 

पेट्रोवरील कर (प्रतिलिटर/टक्के)  केंद्र सरकार : 19.48  महाराष्ट्र राज्य : 39.12  (मुंबई) 

डिझेलवरील कर (प्रतिलिटर/टक्के)  केंद्र सरकार : 15.33  महाराष्ट्र राज्य : 24.78  (मुंबई)  पेट्रोलियम उत्पादनातून केंद्राला उत्पादन शुल्क  आर्थिक वर्ष 2014-15 : 99 हजार 184 कोटी रुपये  आर्थिक वर्ष 2017-18 : 2 लाख 29 हजार 19 कोटी रुपये 

कच्च्या तेलाच्या प्रतिबॅरेलचा 77 डॉलरवर पोहोचलेला भाव, डॉलरच्या तुलनेत रुपयाची 72 रुपयांपर्यंत झालेली घसरण, इराणकडून नोव्हेंबरपासून इंधन खरेदीसाठी अमेरिकेकडून घालण्यात आलेले निर्बंध, "ओपेक'कडून प्रतिदिन एक बिलियन बॅरेलवरून 1.5 बिलियन एवढे उत्पादन वाढविण्यास दाखविण्यात आलेली असमर्थतता, खुल्या केलेल्या इंधनाच्या किमती या सर्वांचा परिणाम दरवाढ होण्यावर झाला आहे. हे रोखण्यासाठी सरकारने वाढीव किमतीवर नफा घेऊ नये. कराची रक्कम निश्‍चित करावी.  - पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन, पुणे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com