agriculture news in marathi, Phule Jaishree first Cherry tomato variety developed by MPKV | Agrowon

चेरी टोमॅटोचा ‘फुले जयश्री’ वाण विकसित
अनिल देशपांडे
मंगळवार, 5 जून 2018

राहुरी, जि. नगर : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने टोमॅटोचा फुले जयश्री हा चेरी टोमॅटोचा वाण नुकताच प्रसारित केला आहे. महाराष्ट्रात बाजारपेठेत हा टोमॅटो आणणारे हे पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे. 

राहुरी, जि. नगर : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने टोमॅटोचा फुले जयश्री हा चेरी टोमॅटोचा वाण नुकताच प्रसारित केला आहे. महाराष्ट्रात बाजारपेठेत हा टोमॅटो आणणारे हे पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे. 

नेहमीच्या फळभाज्यांसोबत परदेशी (एक्झॉटिक) भाजीपाल्यांनाही चांगली मागणी राहते. अनेकवेळा अतिरिक्त उत्पादनामुळे नेहमीचा टोमॅटो मातीमोल भावाने विकला जातो. त्या तुलनेत चेरी टोमॅटो या ‘एक्झॉटिक’ भाजीपाला या प्रकारात येणाऱ्या टोमॅटोस पॅकिंगच्या माध्यमातून तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो दर मिळण्याची संधी असते. तारांकीत हॉटेल्सलमधून सॅलडच्या हेतूने चेरी टोमॅटोला चांगली मागणी असते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात गेल्या सात वर्षांपासून या वाणावर संशोधन सुरू होते. निवड पद्धतीने हा वाण विकसित केला असल्याचे संशोधक डॉ. ज्ञानेश्र्वर क्षीरसागर यांनी सांगितले. टोमॅटोचा आंबट गोड स्वाद असणाऱ्या या वाणाचे फळाचे सरासरी वजन ६.३० ग्रॅम आहे. हेक्टरी सरासरी उत्पादन ५३.३१ टन मिळते. विद्राव्य घटकाचे प्रमाण त्यात ६.३२ टक्के आहे. विषाणूजन्य रोगांना हा वाण मध्यम प्रतिकारक्षम आहे. हा वाण पश्र्चिम महाराष्ट्रासाठी शिफारशीत केला आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरांत चेरी टोमॅटोला चांगली मागणी आहे. खरीप व रब्बी हंगामांबरोबरच शेडनेटमध्ये उन्हाळी हंगामातही चेरी टोमॅटो घेता येतो.

कृषी विद्यापीठात शेडनेटमध्ये या प्रयोगाचे निष्कर्ष समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. या वाणाच्या विविध संशोधन केंद्रांवर विविध हंगामांत चाचण्या घेतल्या असून, त्याचेही निष्कर्ष चांगले दिसले आहेत. या वाणाचे बियाणे कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहेत. या संशोधनामुळे शेतकऱ्यांना चेरी टोमॅटोचा पर्यायी खात्रीशीर वाण उपलब्ध होण्याची संधी निर्माण झाली आहे.

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोग ठीक; पण शेतकरी आयोगाचे काय?१९४७ ते १९९० आणि १९९० ते २०१८ असे दोन भाग केले,...
वीजवापरातील ‘अंधार’वी ज दरवाढ तसेच शेती पंपासाठीची बिलं दुरुस्त करून...
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...