नुकसानग्रस्त केळीच्या जागी पिलबागा

नुकसानग्रस्त केळीच्या जागी पिलबागा
नुकसानग्रस्त केळीच्या जागी पिलबागा

जळगाव ः जिल्ह्यात वादळग्रस्त केळीबागांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिलबागांचे नियोजन केले आहे.  नुकसान कमी खर्चात भरून काढण्याचा प्रयत्न रावेर, चोपडा, यावल भागांतील शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यात मे व जून महिन्यांत वादळाचा मोठा फटका बसला. रावेरात सुमारे १८०० हेक्‍टरवरील केळी १ ते ३ जूनदरम्यानच्या पावसात जमीनदोस्त झाली. नंतरही वादळ झाले. त्यात चोपडा, यावल तालुक्‍यातील बागांना फटका बसला. जिल्ह्यात एकूण

तीन हजार ८०० हेक्‍टर केळीचे नुकसान झाले. यात कापणीवरील बागांचा अधिक समावेश असून, या बागांमध्ये पिलबाग आहेत. नुकसानग्रस्त केळीची झाडे कापून ती बागेबाहेर फेकण्यासाठी मजुरी लागली. घडही पशुधनाला खाऊ घालावे लागले. ६० ते ७० टक्‍क्‍यांवर नुकसान अनेक शेतकऱ्यांना झाले. ते भरून काढण्यासाठी नुकसानग्रस्त बागेत फुटवे वाढवून त्याचा पिलबाग घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी शोधला आहे. जिल्ह्यात एरवी पिलबाग फक्त रावेरात घेतले जातात. त्याचा फारसा खर्च नाही. नव्याने कंद आणणे, ठिबक टाकणे, शेणखत पसरविणे, अधिकची रासायनिक खते देणे हा खर्च नाही. झाड कापून त्याच्या नजीक फुटव्यांचे संगोपन करायचे आहे. त्यासाठी अधिकचा खर्च नाही. त्यात नुकसानग्रस्त झाडांचे अवशेषही अधिक असून, त्याचे आच्छादन करण्यातस आले आहे.

शिवाय फुटव्यांची वाढ जोमात असते. नऊ ते १० महिन्यांत हे पीक हाती येईल. पिलबागांना दरही नवतीप्रमाणेच मिळतात. पुढील मार्च महिन्यापर्यंत कापणी सुरू होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वादळाचा मोठा फटका केळीला बसला. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी पिलबागांचे नियोजन केले. नुकसानग्रस्त घड व झाडे कापून त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली. आता पिलबागांची वाढ जोमात आहे. - अतुल पाटील, केळी उत्पादक, केऱ्हाळे, ता. रावेर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com