agriculture news in Marathi, pilot project will be held in solapur district for Infertile land development, Maharashtra | Agrowon

नापीक जमिनी कार्यक्षमतेसाठी दक्षिण सोलापुरात पथदर्शी प्रकल्प
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 डिसेंबर 2017

भंडारकवठे येथे ओढ्याजवळील सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील ७०० एकर क्षेत्र पाणथळ व क्षारपडमुळे बाधित झाले आहे. या जमिनीला पुनर्वापरात आणणे शक्‍य होणार आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
- राजकुमार शेळके, उपअभियंता, लघू पाटबंधारे व संशोधन विभाग, पंढरपूर

सोलापूर ः नापीक शेतजमिनींच्या पुनर्वापराची पडताळणी घेण्यासाठी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठी त्यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात एक पथदर्शी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाची नुकतीच भंडारकवठे (दक्षिण सोलापूर) येथे सुरवात झाली.
 
राज्यातील प्रत्येक गावात शेतजमिनीचे शेकडो एकर क्षेत्र क्षार, पाणथळ, कुरण यासह विविध कारणांनी वर्षानुवर्षे नापीक व पडीक आहे. या जमिनींचा पीक लागवडीसाठी पुनर्वापर शक्‍य आहे का, याबाबतची चाचपणी घेण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आला आहे.

मतदार संघातील प्रत्येक गावात विशेषतः नदीकाठच्या क्षेत्रात अशा क्षारपड व पाणथळचे प्रमाण अधिक आहे. त्या शेतजमिनींचे सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याने हे काम प्रामुख्याने अशा गावात हाती घेण्यात आले आहे. संबंधित सरकारी यंत्रणांच्या मदतीने अशा पडीक जमिनींचे सर्वेक्षण करून त्या लागवडीखाली आणल्यास तो देशातला एक ‘पॅटर्न’ ठरणार आहे. 

या कामाची सुरवात नुकतीच भंडारकवठे येथून करण्यात आली. येथील सुमारे ७०० एकर क्षेत्र क्षार व पाणथळाने बाधित आहे, ते क्षेत्र नापीक घोषित आहे. या क्षेत्राचे सर्वेक्षण करून ते लागवडीखाली आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मंत्र्यांनी लघू पाटबंधारे व संशोधन उपविभागास आदेश दिल्याने ही यंत्रणा कामाला लागली आहे. भंडारकवठ्यात या कामाची सुरवात प्रगतशील बागायतदार उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

या वेळी लघू पाटबंधारे संशोधन उपविभागाचे उपअभियंता राजकुमार शेजाळे, शाखा अभियंता मंजुनाथ तुंबळ, भाजपचे तालुका सरचिटणीस यतीन शहा, विकास सोसायटीचे अध्यक्ष भीमाशंकर बबलेश्‍वर, पंचायत समिती  सदस्य एम. डी. कमळे, सहकारमंत्र्यांचे स्वीय सहायक शेखर येरनाळे, सचिन पाटील, बसवराज घोडके, प्रा. व्ही. के. पाटील, सोमनिंग विरदे, मल्लिनाथ बबलेश्‍वर, सोमनिंग कमळे, ओमकुमार मुक्काणे, संतोष कमळे उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...