Agriculture News in Marathi, pink bollworm hit cotton crop, farmer organisation demand compensation to farmer, maharashtra | Agrowon

बीटी कापूस उत्पादकांसाठी लढा उभारणार ः पाटील
वृत्तसेवा
रविवार, 26 नोव्हेंबर 2017
अकोला ः बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे बीटी कपाशीचे मोठे नुकसान झाले अाहे. कापूस उत्पादक देशोधडीला लागला असून त्याला अार्थिक मदतीची मोठी गरज अाहे. ती मदत बीटी कंपन्या व शासनाकडून मिळवून देण्यासाठी अापण शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार अाहे. यासाठी कापूस उत्पादकांनीही एकसंधपणे तयार राहावे, असे अावाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले. 
 
अकोला ः बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे बीटी कपाशीचे मोठे नुकसान झाले अाहे. कापूस उत्पादक देशोधडीला लागला असून त्याला अार्थिक मदतीची मोठी गरज अाहे. ती मदत बीटी कंपन्या व शासनाकडून मिळवून देण्यासाठी अापण शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार अाहे. यासाठी कापूस उत्पादकांनीही एकसंधपणे तयार राहावे, असे अावाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले. 
 
मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रगती शेतकरी मंडळ, जनमंच संघटना, शेतकरी कामगार पक्ष, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप यांनी या कार्यक्रमाचे अायोजन केले होते.  
 
श्री. पाटील पुढे म्हणाले, की देशातील कापड उद्योगपती शेतकऱ्यांचे शोषण करून मोठे झाले असून त्यांनाच फायदा व्हावा, या हेतूने नियम व अायात-निर्यात धोरण ठरविल्या जाते. अाता तर व्यापारी वर्गातील लोकसुद्धा निवडून यायला लागले.
 
शेतकऱ्यांचे प्रश्न अात्महत्या करून सुटत नाहीत, तर ते अधिक जटील बनत अाहेत. अाता तर ऊस पट्ट्यातही अात्महत्या सुरू झाल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट मोठमोठ्या उद्योगाच्या मदतीने घातल्या जात अाहे.
 
शेती प्रश्न सरकारने निर्माण केले. उत्पादन खर्च त्यावर अधिक ५० टक्के नफा असे अाश्वासन देऊन सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारने मात्र असा बाजारभाव देणे शक्य नाही, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करून अाश्वासन मोडीत काढत विश्वासघात केला, अशी टीकाही त्यांनी केली.  या वेळी विजय गावंडे, राजू वानखडे, किशोर ढमाले यांनीही मनोगत व्यक्त केले.

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...